अंजली सुरवसे
अंजली सुरवसे भारत नागणे
महाराष्ट्र

सोलापुरात हुंडाबळीची घटना; नातेवाईकांचा हत्या केल्याचा आरोप, पण...

भारत नागणे

भारत नागणे

पंढरपूर: माढा तालुक्यात हुंडाबळीची खळबळजणक घटना समोर आली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेने विहीरीत उडी मारुन आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी स्पष्ट झाले असले तरी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आरोपी पतीच्या घरासमोरच मृत विवाहितेवर अत्यंस्कार केले. या घटनेने संपूर्ण सोलापूर (Solapur) जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या गावात तणावपूर्ण वातावरण आहे.

अंजली सुरवसे असे या मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती, सासूसह इतर सहा जणांवर विरोधात टेंभूर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजलीचा सहा वर्षापूर्वी मिटकलवाडी येथील हणमंत सुरवसे यांच्याबरोबर विवाह झाला होता.

लग्नानंतर अंजलीकडे पती, सासू घरातील इतरांकडून ट्रॅक्टर खरेदीकरण्यासाठी दोन लाख घेवून असे वारंवार सांगून तिचा मानसिक व शारिरीक छळ सुरु होता. तरीही अंजलीच्या वडीलांनी पती हणमंत सुरवसे याला 50 हजार दिले होते. त्यानंतरही लग्नात हुंडा कमी दिल्याच्या राग मनात धरुन अंजिलीचा छळ सुरुच होता. याची माहिती तीने आपल्या आईवडील व इतर नातेवाईकांनाही दिली होती.

नातेवाईकांनी पतीची समजूत काढून अंजलीला त्रास देवून नका अशी विनंती केली होती. तरीही तिचा छळ सुरुच होता. अखेर सासरच्या छळास कंटाळून अंजलीने 30 मे रोजी विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली. दरम्यान, ही आत्महत्या नसून सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा खून केला आहे असा आरोप अंजलीचे मामा दिगंबर मिसाळ यांनी केला आहे.

हे देखील पाहा-

यावेळी संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत मृतदेह पोलिस ठाण्यात ठेवून आंदोलनही केले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृत अंजलीवर आरोपी पतीच्या घरासमोरच अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना तत्काळ तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आरोप पतीला अटक केली आहे. शवविच्छेदनाच्या अवाहल प्रतिक्षेत आहे. तो आल्यानंतरच खून की आत्महत्या हे स्पष्ट होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weightloss Tips: मासिक पाळीनंतर खा हे पदार्थ , वजन होईल कमी

Shubman Gill Statement: गुजरातचं नेमकं चुकतय तरी कुठं? कर्णधार शुभमन गिलने सांगितली पराभवाची कारणं

Mahadev Betting App Case : २००० सीम कार्ड, १७०० बँक खाते, ३२ आरोपी आणि १५००० कोटींचा स्कॅम; काय आहे महादेव बेटिंग अॅप घोटाळा?

Why Aamir Khan Called Mr. Perfectionist : आमिर खानला ‘बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट’चा टॅग कसा मिळाला?; शबाना आझमीचं नाव सांगत म्हणाला...

Shirur Crime: भावकीच्या वादातून दोन गटात तुफान राडा.. बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू; शिरुर तालुका हादरला

SCROLL FOR NEXT