Chandrapur Saam TV
महाराष्ट्र

धक्कादायक : प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या, दारु पाजून नदीपात्रात बुडवलं

पतीच्या हत्येसाठी पत्नी सुमन निषादने दिली होती पंधरा हजारांची सुपारी.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : पत्नीने पतीच्या हत्येसाठी पंधरा हजारांची सुपारी दिल्याचा धक्कादायक खुलासा चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur District) बल्लारपूर शहरातील एका सामान्य वाटणाऱ्या घटनेतून समोर आला आहे. सुनियोजित कट रचून प्रियकराच्या मदतीने पत्नीने सुपारी किलरच्या सहाय्याने पतीला नदीपात्रात बुडवून ठार केल्याची ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलीस ठाणे हद्दीतील वर्धा नदीच्या (Wardha River) पात्रात ही घटना समोप आली आहे. आधी सुमन निषाद हिच्या प्रियकराने पती रामेश्वर निषाद (38) याला ढाब्यावर दारू पाजली. परत येताना वर्धा नदी पुलाला कठडे नसल्याने दुचाकी चालविताना मद्यपी पती कोसळल्याचा बनाव केला. त्याच्यासोबत असलेल्या सुरज सोनकर या प्रियकरानेच पोलीस तक्रार केली.

मात्र पोलिसांनी अनैतिक संबंध हे हत्येचे मूळ असल्याचे तपासात निष्पन्न करत आरोपींना बेड्या ठोकल्या. यवतमाळचा सुपारी किलर अभिजीत पांडे याला सुमन निषाद हीने पतीच्या हत्येसाठी पंधरा हजारांची सुपारी दिली होती यामुळे पोलिसांनी पांडेलाही अटक केली आहे. CCTV फुटेजच्या आधारे घटना व त्याआधीचे धाब्यावरील जेवण यातील कालावधी अधिक वाटल्याने मोबाईल CDR ची पडताळणी केल्यावर पोलिसांचा अंदाज अखेर खरा ठरला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

SCROLL FOR NEXT