impure water supply in daryapur near amravati Saam Digital
महाराष्ट्र

Amravati: गढूळ पाण्यावरुन वडनेर गंगाई ग्रामस्थांचा दर्यापूर जीवन प्राधिकरण कार्यालयावर राेष, उपविभागीय अभियंत्यांना दिला इशारा

भविष्यात जर या गढूळ पाण्यामुळे कोणाचा जीव गेल्यास याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल असा इशारा वडनेर गंगाई येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

Siddharth Latkar

- अमर घटारे

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने मागील गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न हा सुटता सुटेना झालेला आहे. दर्यापूर तालुक्यात कित्येक गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे पाण्यापासून नागरिकांचे जीवन हे संकटात सापडलेले आहे. (Maharashtra News)

जल ही जीवन है हे घोषवाक्य असून ते मात्र घोषवाक्य राहिली की काय असा प्रश्न आता सामान्य नागरिकांनी उपस्थित केलेला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दर्यापूरच्या वतीने पाणी बिल वेळेवर न भरल्यास नागरिकांना फौजदारीचे गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा दिला जाताे. परंतु वेळेवर पाणी बिल बिल भरून सुद्धा नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही ही एक दुर्दैवी बाब आहे.

दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथे गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांना अतिशय गढूळ पाणी पाईपलाईन मधून मिळत आहे. पाण्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. तर काही चिमुकली मुले या गडूळपाण्यामुळे आजारी पडले. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ग्रामस्थांनी या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दर्यापूर येथील उपविभागीय अभियंता विजय शेंडे यांना लेखी तक्रार दिली. परंतु या तक्रारीची अद्यापही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कुठलीही दखल घेतली नाही असा आराेप ग्रामस्थांनी केला आहे.

भविष्यात जर या गढूळपाण्यामुळे कोणाचा जीव गेल्यास याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राहील असा इशारा सुद्धा आता वडनेर गंगाई येथील ग्रामस्थांनी दिलेला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

SCROLL FOR NEXT