लखीमपूर दुर्घटनेतील शेतकऱ्यांच्या अस्थींचे चंद्रभागेत विसर्जन... भारत नागणे
महाराष्ट्र

लखीमपूर दुर्घटनेतील शेतकऱ्यांच्या अस्थींचे चंद्रभागेत विसर्जन...

शेतकरी नेते विनायक पाटील यांनी पुढाकार घेऊन मृत शेतकऱ्यांच्या व एका पत्रकारांची अस्ती चंद्रभागा विसर्जनासाठी पंढरीत आणल्या होत्या.

भारत नागणे

पंढरपूर: उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या मृत शेतकऱ्यांच्या अस्थींचे आज पंढरपुरातील चंद्रभागा नदीत विसर्जन करण्यात आले. (Immersion of bones of farmers killed in Lakhimpur violence in Chandrabhaga river)

हे देखील पहा -

विठ्ठल हा शेतकऱ्याचं दैवत आहे येथे येणारा भाविक हा शेतकरी आहे. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांविरोधात लढण्यासाठी शेतकऱ्यांना शक्ती मिळावी असे साकडे यावेळी शेतकऱ्यांनी विठू चरणी घातले. शेतकरी नेते विनायक पाटील यांनी पुढाकार घेऊन मृत शेतकऱ्यांच्या व एका पत्रकारांची अस्ती चंद्रभागा विसर्जनासाठी पंढरीत आणल्या होत्या. त्यापूर्वी या अस्ती दर्शनासाठी नामदेव‌ पायरी येथे ठेवण्यात आल्या होत्या.

नामदेव पायरीपासून चंद्रभागा घाटापर्यंत वारकरी दिंडी काढून विठू नामाच्या जयघोषामध्ये या अस्थींचे चंद्रभागेच्या पात्रात विसर्जन करण्यात आले. अस्थी विसर्जनासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी व वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT