आयएमडीच्या नव्या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून देशासह राज्यात वेळेपूर्वीच दाखल झाला. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात पावसाने दमदार बॅटिंग सुरू केली. यावर्षी राज्यात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे, मात्र पावसाचं हे प्रमाण असमान आहे. विदर्भ आणि कोकणात जोरदार पाऊस झाला, मात्र मराठवाड्याला अजूनही चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अति अल्प पाऊस झालाय. चांगला पाऊस झाला नसल्यामुळे पिके संकटात सापडली आहेत. त्यात पुढील दोन आठवडे पाऊस नसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलीय. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार, मध्य भारत आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे.
राज्यात मान्सूनची अवस्था सध्या कमजोर झालीय. पुढील दोन आठवडे तरी राज्यात अशीच स्थिती कायम राहणार आहे. मान्सून ट्रफ आपल्या सामान्य स्थानापेक्षा अधिक उत्तरेकडे सरकरल्यानं मध्य भारत आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला असल्याची माहिती हवामान विभागाने दिलीय.
आयएमडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, मान्सून ट्रफ उत्तरेकडे सरकण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या ते हिमालयाच्या पायथ्याशी सक्रिय आहे. , त्यामुळे सध्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशात आणि पूर्वोत्तर राज्यात चांगला पाऊस पडत आहे. मात्र दुसरीकडे मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मान्सून पावसाने उसंत घेतलीय. पण सहा ऑगस्टनंतर दक्षिण भारतात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होईल असा अंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.