IMD warns of unseasonal rain in Mumbai Pune Thane Kalyan Konkan Madhya Maharashtra and Marathwada Weather Updates Saam TV
महाराष्ट्र

IMD Rain Alert: राज्यात ऐन थंडीत बसरणार पावसाच्या सरी; काही तासांतच ‘या’ जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

IMD Weather Alert: ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरण तयार झालं असून देशासह राज्यातील काही भागांत पावसाच्या सरी बरसत आहे.

Satish Daud

Maharashtra Weather Updates, Rain News

मागील काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होत आहे. ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरण तयार झालं असून देशासह राज्यातील काही भागांत पावसाच्या सरी बरसत आहे. त्यामुळे नागरिकांना कधी उकाडा, कधी थंडी तर कधी पावसाचा सामना करावा लागत आहे. बुधवारी कोकणातील काही भागांत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऐन खरीप हंगामातील पिके काढणीला असताना अवकाळी पावसाचं संकट ओढवल्याने बळीराजाचं टेन्शन वाढलं आहे. अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा (Rain Alert) दिला आहे. येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पुणे, कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांतही अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पीकांची काळजी, घ्यावी असा सल्लाही देण्यात आला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण (WeatherUpdates) निर्माण झालं आहे.

त्याचबरोबर केरळ आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच केरळ किनारपट्टीपासून दक्षिण अरबी समुद्रात खालच्या भागात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. परिणामी पुढील सहा ते सात दिवस राज्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात कुठे-कुठे कोसळणार पाऊस?

बुधवारी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी तसेच पुणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाने अचानक हजेरी लावली. आता येत्या २४ तासांत पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा नेस्कोमध्ये होणार

ST Fare Hike : एसटी बसच्या तिकिट दरात मोठी वाढ, दिवाळीआधी सर्वसामान्यांना झटका

Jalgaon : अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका; गिरणा नदीच्या पुरात हजारो झाडे जमीनदोस्त, शेतकरी संकटात

Thane To Buldhana Travel: ठाण्यावरुन बुलढाण्याला प्रवास कसा करायचा? रेल्वे, खाजगी बस आणि टॅक्सी जाणून घ्या सर्व मार्ग

Symptoms of Heart Attack: महिनाभर आधीच दिसतात हार्ट अटॅक लक्षणं, या ५ संकेताकडे दुर्लक्ष करू नका

SCROLL FOR NEXT