IMD Warns Heavy Rain Alert in Mumbai Pune konkan marathwada vidarbha maharashtra weather updates Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert: गणपती बाप्पा पावणार अन् मुसळधार पाऊस कोसळणार; 'या' जिल्ह्यांना आज झोडपून काढणार

Maharashtra Weather Updates: कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई, पुण्यासह ठाण्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Satish Daud

Today Weather Updates News

गणपती बाप्पाचं आगमन होताच राज्यात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला नसला, तरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या.

पण आता हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील ४८ तासांत म्हणजेच येत्या दोन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात धुव्वांधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. (Latest Marathi News)

मुंबई, पुण्यासह ठाण्यात जोरदार पावसाची शक्यता (Weather Alert) वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं असून काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहे.

अजूनही काही जिल्ह्यांना जोरदार पावसाची प्रतिक्षा (Rain News) आहे. बाप्पाच्या आगमनामुळे तरी वरूणराजा प्रसन्न होईल आणि जोरदार पाऊस येईल, अशी अपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांना लागून आहे. अशातच हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

२१ सप्टेंबरपासून मुंबई पुण्यासह कोकण तसेच घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविण्यात आला आहे. आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नंदुरबार, नाशिक आणि धुळे जिल्ह्यासाठी अलर्ट दिला होता.

आता बुधवारी नाशिक, नंदुरबारमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहगे. याशिवाय धुळे, रायगड, पालघर, पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा अलर्ट आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर आज मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

SCROLL FOR NEXT