IMD Warning of unseasonal rain in Maharashtra Tamil Nadu Manipur Mizoram Tripura during the next 48 hours Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain: अवकाळी पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार; पुढील ४८ तासांत 'या' भागात कोसळणार, IMDचा अंदाज

Maharashtra Rain News: हवामान खात्याने पुढील ४८ तासांत अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे.

Satish Daud

Maharashtra Rain Latest News

मिचाँग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरण तयार झाल्याने थंडी गायब झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अशातच, हवामान खात्याने पुढील ४८ तासांत अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस देशातील काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता (Rain Alert) आहे. महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि लक्षद्वीपमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस होईल.

त्याचबरोबर आज आणि उद्या केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिक्कीम, बंगालच्या काही भागात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय आणि आसाम तसेच झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये पावसाची शक्यता आहे.

आठवडाच्या सुरुवातील बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचाँग चक्रीवादळाने धुमाकूळ घातला होता. या चक्रीवादळाने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना चांगलाच तडाखा दिला होता. चेन्नईमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास आज आणि उद्या पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र राज्यातीलकाही भागात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरीत ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS धर्मांतर प्रकरण; संशयितांच्या जामीन अर्जावर आज येणार निकाल

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

SCROLL FOR NEXT