Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Cyclone Alert : मोंथा चक्रीवादळ निवळलं? राज्यात पावसाचा जोर कायम, 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : ‘मोंथा’ चक्रीवादळ निवळल्यानंतर कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशाकडे सरकल्याने महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचे आगमन झाले आहे. हवामान खात्याने मुंबईसह कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

Alisha Khedekar

मोंथा चक्रीवादळ निवळलं

मुंबईसह अनेक जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज

हवामान खात्याचा जिल्ह्यांना येलो अलर्ट

हवामानातील बदलामुळे आरोग्य समस्या वाढण्याची शक्यता

राज्यावर मोंथा चक्रीवादळाचं संकट कायम असल्याने पावसाने महाराष्ट्रात पुन्हा हजेरी लावली आहे. आज सकाळपासून मुंबईसह उपनगरात पावसाच्या कोसळधारा पाहायला मिळाल्या आहेत. ‘मोंथा’ चक्रीवादळ निवळल्यानंतर कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशाकडे सरकत आहे. आज उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे.

‘मोंथा’ चक्रीवादळ निवळल्यानंतर कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशाकडे सरकत असल्याने पावसाला परिपूर्ण वातावरण राज्यात निर्माण झाले आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सिंधुदुर्गमधील मालवण आणि रत्नागिरी येथे सर्वाधिक १२० मिलिमीटर पाऊस झाला. कोकणातील रामेश्वर, सावर्डे, गुहागर, जव्हार, जालना, वाशीम जिल्ह्यातील येथे ७० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली. उर्वरित राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. पावसाच्या हजेरीने राज्याच्या कमाल तापमानात हळूहळू घट होऊ लागली आहे.‎ ‎सांताक्रूझ येथे राज्यातील सर्वाधिक ३४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज सकाळी मुंबईसह उपनगरात पासने दमदार हजेरी लावली. सकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मुंबईसह आज कोकणातील रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाचा, तर पालघर, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज असल्याने हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे.

उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह, हलक्या पावसाची, तसेच कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान हवामानात होणाऱ्या चढउताराने ताप, सर्दी, खोकला सारखे आजार डोकं वर काढत आहेत. हवामान खात्याने सांगितल्यानुसार, आजचा संपूर्ण दिवस महत्त्वाचा असून राज्यात ऊन पावसाचा लपंडाव कायम राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे हादरले! पत्नीची निर्घृण हत्या करून पतीनेही संपवले आयुष्य; कारण वाचून पायाखालील जमीन सरकेल

Tuljabhavani Temple: तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय; आता व्हीआयपी दर्शन बंद, काय आहे नेमका नियम?

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

SCROLL FOR NEXT