Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Today Temprature : महाराष्ट्र पुन्हा गारठणार! जानेवारीमध्ये कडाक्याच्या थंडीचा अंदाज, वाचा आजचे हवामान कसे असेल

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडीची लाट तीव्र झाली असून अनेक जिल्ह्यांत १०°C पेक्षा कमी तापमान. पुढील 48 तासात तापमानात 2–3 अंश घट होण्याची शक्यता असून गुलाबी थंडीत नववर्षाचे स्वागत होणार आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात तापमानाचा पारा पुन्हा घसरला

  • थंडीचा मुक्काम वाढणार

  • अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा १० अंशाखाली

  • थंडीने नवर्षाचे स्वागत होणार

राज्यात थंडीचा कडाका वाढला असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळत आहेत. किमान तापमानात घट झाल्याने गुलाबी थंडीने नववर्षाचे स्वागत होणार आहे. आज राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार कायम राहणार आहे. तर दोन दिवसांत तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शिवाय पावसाप्रमाणे थंडीचा मुक्काम देखील लांबणीवर जाणार आहे.

सोमवारी परभणीत ६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड येथे ७.३ अंश सेल्सिअस, अहिल्यानगर येथे ७.७ अंश सेल्सिअस, तर धुळे येथे ७.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. गोंदिया येथे ९ अंश, तर जेऊर, नाशिक, भंडारा, बुलडाणा, ‎नागपूर आणि ‎यवतमाळ येथे १० अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. आज पहाटेच्या वेळी काहीसे धुके आणि दव पडल्याचे दिसून आले. शिवाय आज राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याबरोबरच थंडी टिकून राहण्याचा अंदाज आहे. दोन दिवसांनंतर किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यातील जिल्ह्यांचे तापमान

पुणे : १०.१

अहिल्यानगर : ७.७

धुळे : ७.८

जळगाव : १२.४

जेऊर : ९.५

‎‎कोल्हापूर : १४.५

‎महाबळेश्वर : ११.५

मालेगाव : १०.२

‎‎नाशिक : ९.८

निफाड : ७.३

‎‎सांगली : १२.४

‎सातारा : १०.८

‎सोलापूर : १४.१

‎सांताक्रूझ : १७.०

डहाणू : १६.६

‎रत्नागिरी : १७.३

‎छत्रपती संभाजीनगर : १०.५

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC Mayor: मोठी बातमी! कल्याण-डोंबिवलीत महापौर शिंदेसेनेचा, मनसेने दिला पाठिंबा

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंचे राजेंद्र राठोड यांचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

Sanjay Raut: शिंदेंना दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावं लागतं, संजय राऊत यांची खरपूस टीका

Mumbai Bellasis Bridge : मुंबईकरांसाठी खुशखबर! मुंबई सेंट्रलमधील 'तो' ब्रिज सोमवारी होणार खुला, वाहतूककोंडी होणार कमी

Nagarsevak Salary: तुमच्या शहरातील नगरसेवकांचा पगार किती असतो?

SCROLL FOR NEXT