Students and parents protest on road alleging illegal sale of a Zilla Parishad school in Vinchur village, Nashik Saam Tv
महाराष्ट्र

100 वर्षे जुनी शाळा विकली? बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री?

Nashik Zp School Sold Fake Documents: नाशिक जिल्हयात शिक्षण क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. बनावट कागदपत्रांच्या आधारे चक्क शाळा विकल्याचा प्रकार घडलाय. या प्रकारावरुन आक्रमक झालेल्या विद्यार्थी आणि पालकांनी रास्तारोको केलाय.

Girish Nikam

मराठी शाळा जिवंत राहिल्या पाहिजेत, पटसंख्या वाढली पाहिजे अशा घोषणा होत असतात मात्र त्या किती पोकळ आहेत याचं उदाहरण म्हणजे नाशिकमध्ये परस्पर विकली गेलेली जिल्हा परिषदेची शाळा ..काय आहे हे प्रकरण... तर निफाड तालुक्यातल्या विंचूर गावात शंभर वर्षे जुनी शाळा आहे. तीनशे विद्यार्थी या शाळेत शिकतायत.. गुजरातमधील मुखत्यार पत्राच्या आधारे या शाळेची विक्री करण्यात आलीय. एवढंच नाही तर शाळेची खरेदी करणा-यांनी शाळेच्या जागेवर सोयाबीन पिकाची लागवड केल्याची नोंद शासन दरबारी केल्याची माहितीही समोर आलीय. आता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यार्थी, पालक रस्त्यावर उतरून आंदोलन केलं.

दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यांना संबंधित नोंद रद्द करण्याचे आदेश दिलेत.

भुजबळ यांच्या हस्तक्षेपानंतरही नागरिक स्त्यावरून हटायला तयार नाहीत. ग्रामीण भागात अजुनही जिल्हा परीषदेच्या शाळांचा मोठा आधार आहे. मात्र शाळाच विक्रीला काढून विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणण्याच्या या कारस्थानामागे कोण-कोण धनदांडगे आहेत ? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Birth Certificate : फक्त १० रूपयांत कोणत्याही वयात मिळवा जन्म दाखला, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Maharashtra News Live Update: पुणे-सातारा महामार्गावर कंटेनर पलटी होऊन अपघात

High blood pressure: कसं ओळखाल की तुमचा रक्तदाब वाढलाय?

परवेझनं अल्पवयीन हिंदू मुलीला जाळ्यात अडकवलं,८ मित्रांना अश्लील व्हिडिओ पाठवला; खेडामध्येही अमरावतीसारखा कांड

Death News: प्रसिद्ध निर्मात्यावर दु:खाचा डोंगर; अक्षय तृतीयादिवशी जवळच्या व्यक्तीचे निधन

SCROLL FOR NEXT