Panchgani Table Land News saam tv
महाराष्ट्र

Panchgani: टेबल लँण्डला भूस्खलनाचा धाेका; प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोव-यात

या उत्खनामुळे या ठिकाणी टेबल लँण्ड ढासळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

ओंकार कदम

सातारा : महाराष्ट्राचा मिनी काश्मिर म्हणून ओळख असणाऱ्या पाचगणी (panchgani) येथे जगभरातून पर्यटक (tourists) येत असतात. पाचगणीतील टेबल लँण्ड (panchgani table land) हा हे पर्यटन स्थळ पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र आहे. सध्या या टेबल लँण्ड अवैध उत्खनन आणि अवैद्य बांधकाम यांची नजर लागली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी सातारा (satara) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पाचगणी आणि महाबळेश्वर (mahableshwar) येथील अवैद्य बांधकाम आढळून आल्यास तात्काळ कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले हाेते. परंतु काही धनाढ्य लोकांमुळे आता महाबळेश्वर आणि पाचगणीचे निसर्ग सौंदर्य धोक्यात आलेला आहे. (satara latest marathi news)

पाचगणीच्या टेबल लँण्डच्या खालच्या बाजूस २४२ नंबरच्या प्लाॅटमध्ये मुंबई (mumbai) मधील एका व्यावसायिकाने जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने बेसुमार अवैद्य उत्खनन केले आहे. यामुळे टेबल लँण्ड परिसर धोक्यात आला आहे. परवानगी पेक्षा जास्त उत्खनन या ठिकाणी केले गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या उत्खनामुळे या ठिकाणी टेबल लँण्ड ढासळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. एका बाजुने आधीच कमकुवत झालेल्या टेबल लँण्डला या उत्खनामुळे मोठा धोका निर्माण झाला असुन याच्या खाली अनेक घरं आणि एक शाळा देखील आहे.

त्यामुळे एका धनिकासाठी प्रशासन अनेकांचा जीव टांगणीला लावत असल्याचं पहायला मिळत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी हाेऊ सुद्धा संबंधितांवर काेणतीच कारवाई झाली नाही अशी देखील माहिती समाेर येत आहे. संबंधितांनी याठिकाणी बंगले सुद्धा उभारले आहेत. सार काही नियमांना तिलाजंली देत हाेत असल्याने प्रशासनाच्या कामकाजावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान माळीन सारखी भयानक दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे हाेणार का असा प्रश्न विचारला जात आहे. या सर्व प्रकारामुळे महाबळेश्वर तहसील कार्यालय संशयाच्या भोव-यात आले आहे. प्रशासन टेबल लँड भाेवती सुरु असलेली चुकीची कामे थांबवणार का हे पाहावं लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT