लग्नाची शुटींग ड्रोनद्वारे करताय तर सावधान! SaamTv
महाराष्ट्र

लग्नाची शुटींग ड्रोनद्वारे करताय तर वाचा हि बातमी!

ड्रोन उडविणारे ड्रोनचालक हे प्रशिक्षित असणे आणि कार्यक्रमात जर ड्रोन वापरायचे असतील तर स्थानिक पोलिसांची परवानगी असणे आवश्यक आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : पूर्वी लग्न समारंभ करताना फोटोग्राफर फोटो काढून अल्बम देत असे. मात्र आधुनिक काळात आता फोटोग्राफीचे स्वरूप बदलले असून फोटोग्राफरही हायटेक झाले आहेत. लग्न आणि प्री वेडिंग शूटिंग आता ड्रोनच्या साहाय्याने होऊ लागले आहे. मात्र ड्रोन उडविणारे ड्रोनचालक हे प्रशिक्षित असणे आणि कार्यक्रमात जर ड्रोन वापरायचे असतील तर स्थानिक पोलिसांची परवानगी असणे आवश्यक आहे. मात्र, राज्यात ड्रोन प्रशिक्षण आणि लायसन्स सुविधा नसल्याने अनेक ड्रोन चालकांची अडचण होत आहे. याबाबत ड्रोन प्रशिक्षण आणि लाईसन्सची सुविधा राज्यात आणि जिल्ह्यात होणे गरजेचे असून त्यामुळे अधिकृतपणे हा व्यवसाय करणे सोयीचे जाणार असल्याचे ड्रोन चालकांचे म्हणणे आहे.

हे देखील पहा -

लग्नाआधी प्री वेडिंग शूटिंग करण्याचा नवा ट्रेंड प्रचलित झाला आहे. त्याचबरोबर लग्न समारंभ देखील ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने शूट केले जात आहेत. मात्र, अनेकवेळा ड्रोनशूटिंग करणारे चालक हे प्रशिक्षित नसतात. त्याचबरोबर स्थानिक पोलीस ठाण्याची परवानगी ही घेतलेली नसते. त्यामुळे अडचणी निर्माण होतात. ड्रोन उडवताना शासकीय कार्यालयाची शुटींग करण्यासही बंदी आहे. या नियमांचे योग्य प्रकारे पालन होताना दिसत नाही. यासाठी प्रशिक्षित लायसन्स धारक ड्रोनचालक असणे महत्त्वाचे आहे. पोलिसांची परवानगीही घेणे गरजेचे आहे.

ड्रोनद्वारे शुटींगच्या प्रशिक्षणास परवानगी देण्याबाबत अजित पवार यांचे होते निर्देश :

प्री वेडिंग संकल्पना ही चांगलीच रुजू झाली असून त्यामुळे फोटोग्राफर, शुटींग व्यवसायिकांना एक नवे दालन निर्माण झाले आहे. प्री वेडिंग शुटींग ह्या समुद्रकिनारी, ऐतिहासिक स्थळी, निसर्गाच्या सानिध्यात केल्या जात आहेत. मात्र, यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी गरजेची आहे. प्रशासनाची परवानगी असतानाही अनेक वेळा प्री वेडिंग शुटींग व्यवसायिकांना अडचणी येत आहेत. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीवर्धन येथे आले असता प्री वेडिंग व्यवसायिकांसाठी नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले होते. प्री वेडिंगच्या माध्यमातून पर्यटनालाही चालना मिळेल असा यामागचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्देश आहे. मात्र अद्यापही यासंदर्भात कोणतीही हालचाल प्रशासकीय अथवा शासनस्तरावर होताना दिसत नाही.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाने महाराष्ट्राची चिंता वाढली, मुरबाडमधील ११२ पर्यटक अडकले

Nepal Protest: नेपाळमध्ये जे घडलं ते भारतातही घडेल; खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची बीडच्या शृंगार वाडीत सभेचे आयोजन सभेची जोरदार तयारी

Solapur Firing : राज्यात चाललंय काय? गाणी लावण्याच्या वादातून राडा; थेट कला केंद्रात गोळीबार

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात, माजी सरपंच आणि नातीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT