Atal Setu Saam Digital
महाराष्ट्र

Atal Setu: म्हणून लालपरी अटल सेतूवरुन धावू शकत नाही, मोठं कारण आलं समोर?

Atal Setu News: अटल सेतूवरून लालपरी चालविण्याबाबत चर्चा सुरू असून एसटी महामंडळाने सर्वेक्षणही केले आहे. मात्र, एसटी बस अटल सेतूवरून धावल्यास मुंबई आणि उपनगरांतील २२ थांबे हुकून प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Sandeep Gawade

Atal Setu

अटल सेतूवरून लालपरी चालविण्याबाबत चर्चा सुरू असून एसटी महामंडळाने सर्वेक्षणही केले आहे. मात्र, एसटी बस अटल सेतूवरून धावल्यास मुंबई आणि उपनगरांतील २२ थांबे हुकून प्रवाशांची गैरसोय होईल. तसेच एसटीच्या उत्पन्नावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यातून मार्ग काढण्याबाबत महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच अटल सेतूचे उद्‌घाटन झाले. समुद्रात बांधलेल्या पुलामुळे मुंबई आणि नवी मुंबई या शहरांदरम्यान प्रवासाचा वेळ अर्ध्यावर आला आहे. एसटी प्रवाशांचा प्रवास जलद व्हावा, यासाठी पहिल्या टप्प्यात ई-बस असलेल्या शिवनेरी अटल सेतूवरून चालवण्याचा विचार एसटी महामंडळाचा सुरू आहे. यासंदर्भात एक सर्वेक्षण करण्यात आले. तो अहवाल महामंडळाकडे सादर केला आहे. शिवनेरी ही प्रामुख्याने दादर-पुणे, स्वारगेट या मार्गावर धावते. दादर ते कळंबोलीपर्यंत अनेक प्रवासी शिवनेरी बस पकडतात. त्यामुळे मुंबई-पुणे शिवनेरी अटल सेतूवर धावली, तर या मार्गावरील प्रवासी बसमध्ये चढू शकणार नाहीत.

या थांब्यांना फटका

पुणे, कोकण, अलिबाग, कोल्हापूरसाठी जाणाऱ्या बससाठी दादर, कुर्ला नेहरूनगर, मैत्री पार्क, मानखुर्द , वाशी, सानपाडा, नेरूळ जंक्शन, खारघर, कळंबोली आणि पनवेल या सात प्रमुख थांब्यांवर प्रवासी चढतात. येथे एसटीची तिकीट बुकिंग सेंटर आहे. याशिवाय सात प्रमुख बस थांब्यांसह एकूण २२ सिटी बस थांबे आहेत. जिथे लांब पल्ल्याचा बस थांबतात. मात्र, अटल सेतूवरून एसटी बस धावल्यास २२ थांब्यांवरील प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

४५ प्रवासी मिळणे आवश्यक

दादर येथून शिवडी मार्गे अटल सेतूवरून एसटी बस सुरू करायची असेल, तर दादर स्थानकावर संपूर्ण बसचे ४५ प्रवासी मिळणे आवश्यक आहे; अन्यथा २२ थांबे हुकवून बस फूल होणे शक्य होणार नाही. त्यातही अटल सेतूवरचे टोल शुल्क जास्त आहे; तरीही प्रायोगिक तत्त्वावर दादर-शिवडी-अटल सेतू-उलवे-पनवेल-पुणे अशा काही फेऱ्या चालवणे शक्य आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सकाळ’ला दिली.

या बस अटल सेतूवरून धावणार?

स्वारगेट-मंत्रालय, सकाळी ६

मंत्रालय - स्वारगेट, संध्याकाळी ६

पुणे स्टेशन - मंत्रालय, सकाळी ६.४५

मंत्रालय - पुणे स्टेशन, संध्याकाळी ६

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

SCROLL FOR NEXT