Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला मराठा आरक्षणासाठी त्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. सरकार या उपोषणाची दखल घेणार का? सगेसोयरेची अधिसूचना काढणार का? जाणून घेऊ...

Girish Nikam

मराठा आरक्षणावरुन संपूर्ण राज्य ढवळून काढणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय. कारण वाशीला मुंबईच्या वेशीवर जरांगेंची पदयात्रा धडकली तेव्हा सरकार चांगलंच धास्तावलं होतं. त्यामुळेच सरकारनं सगेसोय-यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या अधिसूचनेचा मसुदा तयार केला होता. मात्र याची अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे जरांगेंनी ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी आणखी आक्रमकपणे लावू धरली.

गेल्या सहा महिन्यातील जरांगेंची बहुतांशी वक्तव्य ही फडणवीस आणि भुजबळ यांना टार्गेट करणारी आहेत. यावेळीही उपोषण करताना त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. तर फडणवीसांनी जरांगेंच्या टीकेला खोचक उत्तर दिलंय.

'आरक्षण दिलं नाही तर फडणवीस जबाबदार'

याचबद्दल बोलताना मनोज जरांगे-पाटील म्हणाले की, ''मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी. आजपासून आमरण उपोषण सुरू होत आहे. आमच्या आठ-नऊ मागण्या आहेत, त्यावर सरकारने अंमलबजावणी करावी. सरकारने नाही केली तर समाजाने उघड्या डोळ्याने बघावं. मी आरक्षणासाठी उपोषणाला बसत आहे. जर सरकारने नाही दिलं तर याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे.''

सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, हैदराबाद गॅझेटसह सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करावं यासह इतर मागण्यांसाठी जरांगे सहाव्यांदा आमरण उपोषणाला बसणार आहे. जरांगेंनी यापूर्वी पाच वेळा कधी-कधी उपोषण केलंय ते जाणून घेऊ...

पहिलं उपोषण

29 ऑगस्ट 2023

17 दिवस

-------------------

दुसरं उपोषण

25 ऑक्टोबर 2023

9 दिवस

-------------------

तिसरे उपोषण

10 फेब्रुवारी 2024

17 दिवस

-------------------

चौथे उपोषण 4 जुन 2024

10 दिवस

-------------------

पाचवे उपोषण 20 जुलै 2024

4 दिवस

उपोषण, आंदोलन, नेत्यांना गावबंदी, शांतता रॅली अशा अनेक मार्गांनी जरांगेंनी आरक्षणाची धग जिवंत ठेवली.मात्र सरकार दाद देत नसल्यानं मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर पुन्हा उपोषणाला बसतायेत. ऑगस्टला जरांगेंच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालंय. आंदोलनाचं यश म्हणजे कुणबी नोंदी शोधण्याचं मोठं काम सरकारनं केलंय. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण मुद्याचा मोठा फटका महायुतीला बसलाय. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे पुन्हा आक्रमक झाल्यामुळे ही निवडणूक नेमकी कुणाला जड जाणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT