Prajakt Tanpure News Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar News: अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा शरद पवार गट लढवणार, प्राजक्त तनपुरे म्हणाले, 'पक्षाने आदेश दिल्यास...'

Ahmednagar News in Marathi: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे जोरदार तयारी करत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट (Sharad Pawar) अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा लढवणार आहे.

Vishal Gangurde

सुशील थोरात, अहमदनगर

Prajakt tanpure News in Marathi:

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे जोरदार तयारी करत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा लढवणार आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाने आदेश दिल्यास आपण लोकसभा निवडणूक लढू, असं आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हंटल आहे. ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे येत्या 3 आणि 4 जानेवारीला शिर्डी येथे शिबीर होत आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या शिबिरात राज्यभरातील जवळपास दोन हजार पदाधिकाऱ्यांना या शिबिरासाठी निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे.

या शिबिरातून ऊर्जा घेऊन येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी पदाधिकाऱ्यांकडून केली जाईल, असंही तनपुरे म्हणाले.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्याचे सरकार केवळ घोषणा करणारे आणि जाहिरात करणारे सरकार आहे, वास्तविक शेतकऱ्यांना जी मदत व्हायला हवी ती होताना दिसत नाही. याबाबत मी विधानसभा आणि बाहेर देखील बोलतो, असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले आहे.

अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्री, लोकप्रतिनिधी गेले मात्र शेतकऱ्यांना अद्याप मदत झाली नाही, याबाबत तनपुरे यांना विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Pulao vs Biryani: पुलाव आणि बिर्याणीमध्ये काय फरक असतो?

Moringa Leaves Benefits: शरीराची शक्ती वाढवतात 'ही' औषधी पाने, दररोज अशाप्रकारे खाल्ल्यास होईल फायदा

18th Newsmakers Achievers Awards 2026: मुंबईत विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेचा गौरव

SCROLL FOR NEXT