IAS TUKARAM MUNDHE  saam tv
महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंचा दणका! ११ प्रसिद्ध हॉटेल्स आणि बेकऱ्यांचे परवाने निलंबित, ५४ लाखांहून अधिकचा निकृष्ट अन्नसाठा जप्त

IAS Tukaram Mundhe's FDA : दिवाळीपूर्वी महाराष्ट्रात FDA ची मोठी कारवाई! तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ३७,९९१ किलो संशयास्पद व निकृष्ट अन्नसाठा जप्त करण्यात आला असून ५४.६६ लाख रुपयांच्या मालाचा समावेश आहे.

Namdeo Kumbhar

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर एक विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. या धडक कारवाईमुळे अन्नपदार्थामध्ये भेसळ करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. कोकणापासून ते छत्रपती संभाजीनगरापर्यंत FDA ने केलेल्या या कारवाईत चक्क लाखो रुपयांचा राजमा, गूळ, खाद्यतेल आणि दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. (Tukaram Mundhe FDA action before Diwali in Maharashtra)

राज्यभरात केलेल्या या कारवाईत एकूण ३७,९९१.४ किलो निकृष्ट व संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. याची अंदाजित किंमत तब्बल ५४.६६ लाख रुपये इतकी आहे. एवढेच नव्हे तर, अस्वच्छता आणि नियमभंगाच्या कारणावरून तब्बल ११ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकऱ्यांचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत.

नवी मुंबईतील (नेरूळ) 'मे. आरडीसी ॲग्रो व्हेंचर्स' या आस्थापनेतून निकृष्ट दर्जाचा व चुकीचे लेबलिंग असलेला तब्बल ३३,२८६ किलो राजमा व कडधान्यांचा साठा जप्त करण्यात आला. याची अंदाजित किंमत ५०,०४,५८० रुपये आहे. यात 'रेड राजमा स्मॉल' आणि 'बुलेट पल्स'चा समावेश आहे.

सिन्नर आणि नाशिकमधील विविध आस्थापनांवर धाड टाकून ४८३.४ किलो खाद्यतेल (सोयाबीन ऑइल), तूप (बटर/घी) आणि फराळाचे पदार्थ (शेव व पापडी) जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण १,७०,३७० रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून प्रयोगशाळा नसणे व तांत्रिक अहवाल नसणे यांसारख्या त्रुटी आढळल्या.

छत्रपती संभाजीनगर विभागातील 'औरंगाबाद कोल्ड स्टोरेज'मधून ३,७४९ किलो मोकळा गूळ आणि ४७३ किलो बडीशेप असा एकूण ४,२२२ किलो साठा जप्त करण्यात आला. या जप्त केलेल्या मालाची किंमत २,९१,३३५ रुपये आहे.

११ परवाने निलंबित

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकऱ्यांमध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न, अस्वच्छ किचन, गंजलेली भांडी, शिळा पाव ताज्या पावात मिसळणे तसेच कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसणे यांसारख्या गंभीर त्रुटी आढळल्यामुळे अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मुंबई व संभाजीनगरमधील ११ प्रमुख आस्थापनांचे परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.

एम/एस एस. के. बेकरी (माझगाव)

एम/एस नेक्झाद रेस्टॉरंट (ग्रँट रोड)

एम/एस फुडीज मल्टिसुझीन (वांद्रे पश्चिम)

एम/एस अरेबियन लुकमा (जोगेश्वरी पश्चिम)

एम/एस झिडस फूड अँड हॉस्पिट्यालिटी - दिल्ली जायका (कुर्ला पश्चिम)

एम/एस लाईट बाईट फूड्स - यू मी (आर सिटी मॉल, घाटकोपर पश्चिम)

एम/एस बिकगाने बिर्याणी (गोवंडी, चेंबूर)

एम/एस झिडस फूड अँड हॉस्पिट्यालिटी - दिल्ली जायका (कुर्ला पश्चिम)

एम/एस ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेड - डोमिनोज पिझ्झा (भांडुप पश्चिम)

डोमिनोज पिझ्झा (बीड)

के. के. बेकर्स (रहमत नगर, परभणी)

अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत अथवा कोणत्याही गैरप्रकाराबाबत तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा `[https://complaints.mahafda.in](https://complaints.mahafda.in)` या ग्रीव्हन्स पोर्टलवर संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Health : अंतर्वस्त्रे न घालता रात्री झोपणं खरंच फायदेशीर आहे का?

Mumbai Air Pollution: मुंबई जगातील तिसरे प्रदूषित शहर; श्वास घेणंही कठीण, AQI चा धक्कादायक रिपोर्ट

Maharashtra News Live Update: जरांगेच्या ऑडिओ बॉम्बनं राजकारण तापलं! शिवसेना नेते रामदास कदमांचं पंतप्रधान मोदींना पत्र

Custard Apple Buying Tips: गोड आणि रसाळ सिताफळ कसं ओळखाल? खरेदी करताना या टिप्स लक्षात ठेवा

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर, पाहा किती दिवस शाळा बंद राहणार? VIDEO

SCROLL FOR NEXT