आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कडून राज्यभर छापेमारी केली जात आहे. २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी राज्यभरात विशेष तपासणी मोहीम राबवून कमी दर्जाच्या आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांवर मोठी कारवाई केली आहे. राज्यभरातील १४ आस्थापनांमधून (दुकान/कारखाने) तब्बल २५ लाख ५३ हजार ७५८ रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. मावा, सुका मेवा आणि चिप्ससह अनेक भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहे.
काय काय जप्त करण्यात आले?
तपासणीदरम्यान पथकाने ९,३८५ किलो विविध अन्नपदार्थ, ७,५६६ कालबाह्य (Expired) पॅकबंद अन्नपदार्थ, ७,१०४ शीतपेयांच्या बाटल्या आणि ८८ लिटर दूध जप्त केले आहे. जप्त केलेल्या साठ्यात मावा, विविध मिठाई, सुका मेवा, शेव, चिवडा, चिप्स, खोबरा पावडर, गव्हाचे पीठ, सोया चंक्स आणि इन्स्टंट गुलाबजामून मिक्स यांसारख्या दैनंदिन वापरातील पदार्थांचा समावेश आहे.
कुठे अन् का झाली कारवाई?
बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती या विभागांमध्ये ही धडक कारवाई करण्यात आली. विनालेबल विक्री करणे, अस्वच्छ वातावरणात उत्पादन किंवा पॅकिंग करणे, भेसळीचा संशय असणे आणि कालबाह्य (Expired) साठ्याची माहिती न देणे या कारणांमुळे हा साठा जप्त करण्यात आला आहे.
FDA चे व्यापाऱ्यांना आदेश आणि नागरिकांना आवाहन
अन्नपदार्थांची विक्री योग्य लेबलसह आणि स्वच्छ वातावरणातच करावी. परवाना नसणाऱ्या किंवा भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. सुटे आणि विनालेबल अन्नपदार्थ खरेदी करणे टाळावे. खरेदी करताना बॅच नंबर, पॅकिंग तारीख आणि 'Best Before' नक्की तपासावे, असे आवाहन एफडीएकडून करण्यात आले.
काही संशयास्पद किंवा कमी दर्जाचे अन्नपदार्थ आढळल्यास एफडीएच्या १८००-२२२-३६५ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा https://complaints.mahafda.in या पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.