Shahajibapu Patil Saam Tv
महाराष्ट्र

Shahajibapu Patil: 'सांगोल्यात पुन्हा मीच आमदार होणार'; शहाजी बापू पाटील यांचा मोठा दावा

Sangola Assembly Constituency: माजी आमदार राष्ट्रवादीचे नेते दीपक साळुंखे यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे आमदार पाटील आणि साळुंखे हे आमने सामने येणार का?

Ruchika Jadhav

भरत नागणे
Sangola News:

काय झाडी, काय डोंगर ही कॉल रेकॉर्डींग व्हायरल झाल्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील चांगलेच चर्चेत आले होते. आता आगामी निवडणुकींच्या तोंडावर पुन्हा एकदा शहाजी बापू पाटील यांचं नाव चर्चेत आलंय. सांगोल्यात पुन्हा एकदा मीच आमदार होणार, असा दावा शहाजी बापू पाटलांनी केलाय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"मी आमदार आहेच, पुढे पण मीच आमदार राहणार. पण माझ्यासोबत दीपक साळुंखे हे देखील आमदार होतील असे विधान सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आज सांगोल्यात केलं. दीपक साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत कार्यक्रमात आमदार पाटील यांनी हे विधान केलं आहे.

माजी आमदार राष्ट्रवादीचे नेते दीपक साळुंखे यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे आमदार पाटील आणि साळुंखे हे आमने सामने येणार का? या विषयी चर्चा सुरू आहेत. असे असतानाच आता आमदार शहाजी बापू पाटील यांनी यापुढे देखील मीच आमदार राहणार असा दावा केला.

शहाजी बापू पाटील यांनी यावेळी माझ्याबरोबरच दीपक साळुंखे यांना‌ देखील आमदार करणार असं, आश्वासन दिलं आहे. दीपक साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार निलेश लंके आदी उपस्थित होते.

ब्रम्हदेव जरी आला तरी मी सांगोल्यातून विधानसभेची निवडणूक लढवणार ‌

राज्यातील सत्तासंघर्षात अजित पवार गट भाजप शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून लढण्याची तयारी सुरू आहे. अशात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी सांगोल्यातून विधानसभा निवडणुक लढण्याची घोषणा केली. तसेच ब्रम्हदेव जरी आला तरी मी सांगोल्यातून विधानसभेची निवडणूक लढवणार असं त्यांनी म्हटलं. त्यात आता शहाजी बापू पाटील यांनी देखील दावा केल्याने नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

SCROLL FOR NEXT