Ajit Pawar 
महाराष्ट्र

Ajit Pawar: घरात फूट पाडू नका, मी चूक केलीय; नाव न घेता अजित पवारांची कुबली

Ajit Pawar Confess: चंद्रपूर आणि आणि गडचिरोलीच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी आपल्या चुकीची कबुली दिलीय. अजित पवारांच्या या विधानामुळे राजकारणात मोठी माजणार असल्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शरद पवार यांना सोडणं ही चूक होती, अशी नाव न घेताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर कार्यक्रमात कबुली दिलीय. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. भाग्यश्री आत्राम- हलगेकर यांना पक्ष न सोडण्याचा सल्ला देताना अजित पवार यांनी काका शरद पवार यांना सोडण्याची चुकी आपल्याकडून झाल्याची कबुली दिलीय.

अजित पवार हे गडचिरोली आणि चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी आपल्या चुकीची कबुली दिलीय. शरद पवार यांना सोडून आपल्याकडून चूक झाल्याचं ते म्हणालेत. मात्र त्यांनी यावेळी शरद पवार यांचे नवा घेतले नाहीये. दरम्यान धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

त्यामुळे अजित पवारांनी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला.घरात फूट पाडू नका, त्या अनुभवातून मी गेलोय. मी चूक केलीय तुम्ही करू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम- हलगेकर यांना सल्ला देतांना म्हणालेत.

काय म्हणाले अजित पवार

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी अजित पवार गट सोडत शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. त्यामुळे अजित पवार यांनी त्यांना पक्ष न सोडण्याचा सल्ला दिला.तुम्ही तुमच्या वडिलांसोबत राहिलं पाहिजे. लेकी वडिलांचे सर्वात जास्त प्रेम असतं. असताना तुम्ही त्याच्यामध्ये घरात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात. हे बरोबर नाही, हे समाजाला आवडत नाही. आम्ही तो अनुभव घेतलाय. त्यामुळे मी माझ्यी चूक मान्य केली.

धर्माराव बाबा आत्राम यांची शरद पवार गटावर टीका

पक्ष फोडी करणारा पक्ष आता माझं घर फोडण्याचे काम करीत आहे, असा आरोप नाव न घेता अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवार गटावर केला होता. एक मुलगी गेली तरी एक मुलगी आणि एक मुलगा माझ्याकडे आहे. जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल,असेही धर्मरावबाबा आत्राम म्हणाले होती. धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री ह्या परस्पर शरद गटाकडून लढणार असल्याचा दावा केला गेला.

या दाव्यामुळे वडिलांविरुद्ध मुलगी मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर बोलताना धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांकडून माझ्या मुलीला हाताशी घेऊन पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. पण जी मुलगी बापाची नाही झाली ती तुमच्या पक्षाची कशी होणार आहे,असं आत्राम म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Natural Hair Growth Tips: लांब आणि दाट केसांसाठी 'दह्याचा' असा करा वापर; घरच्या घरी मिळवा पार्लरसारखी ट्रिटमेंट

Maharashtra Live News Update : नाशिकच्या येवल्यात दोन बसची समोरासमोर धडक; 8 ते 10 प्रवासी जखमी

Gold Rate: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे ४०००० रुपयांनी स्वस्त; सुवर्णनगरीतील आजचे दर किती?

मुंबईत चाललंय काय? 600 रुपयांच्या उधारीवरून २ गटात हाणामारी आणि अॅसिड हल्ला

Dearness Allowance: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होण्याची शक्यता, किती होणार तुमचा पगार?

SCROLL FOR NEXT