Santosh Bangar Saam Tv
महाराष्ट्र

मला सुरक्षेची आवश्यकता नाही, माझी Y+ दर्जाची सुरक्षा काढून घ्या; संतोष बांगर यांची पोलिसांना विनंती

बांगर हे हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार आहेत.

संदीप नागरे

हिंगोली - शिंदे- फडनवीस सरकारच्या बहुमत चाचणीच्या काही तासापूर्वी शिवसेनेला मोठा धक्का देत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात दाखल झाले होते. बांगर यांनी घेतलेल्या यु-टर्नमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांना वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली होती, आता वाय प्लस सुरक्षे संदर्भात बांगर यांनी पोलिसांना पत्र लिहिले आहे.

उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेमधून (Shivsena) बंडखोरी करत शिंदे गटात सामील झालेल्या राज्यातील बंडखोर आमदारांना राज्य सरकारकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. मात्र ही सुरक्षा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी काढून घेण्याची पोलिसांना विनंती केली आहे.

हे देखील पाहा -

आमदार संतोष बांगर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना लेखी पत्र देत आपल्याला प्रदान करण्यात आलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा काढून घ्या अशी विनंती केली आहे. मात्र हिंगोली पोलिसांनी बांगर यांच्या पत्रावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती दिली आहे.

मराठवाड्यातील शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून आमदार संतोष बांगर यांची ओळख आहे, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोकणात जाऊन कोथळा काढू अशी धमकी दिल्याने आमदार बांगर हे चर्चेत आले होते, आमदार बांगर हे कायम ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ होते मात्र , एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर त्यांनी देखील शेवटी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात एंट्री केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

Shahi Tukda Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही तुकडा,वाचा सोपी रेसिपी

Mug Cleaning Tips: बाथरुममध्ये वापरला जाणारा मग किती दिवसांनी बदलावा? डाग काढण्यासाठी जाणून घ्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT