मी राज्याचा अर्थमंत्री आहे 100 कोटी रुपये देतो अफसर शेखला निवडून द्या - अजित पवार  दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

मी राज्याचा अर्थमंत्री आहे; 100 कोटी रुपये देतो, अफसर शेखला निवडून द्या - अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार हे आज लातुर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेच्या वतीने केलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी औसा येथे आले होते.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज लातुर (Latur) जिल्ह्यातील औसा (Ausa) नगरपालिकेच्या वतीने केलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी औसा येथे आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांसह नागरिकांना खडेबोल सुनावले आहेत. आगामी निवडणुकीत औसा नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख यांना निवडून द्या, मी 100 कोटी रुपये देतो अस अभिवाचन देत आगामी नगर पालिका निवडणूकीचे रणशिंग अजित पवार यांनी फुंकले आहे.

हे देखील पहा :

आज लातुरात आगमन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील लसीकरणाच्या स्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, डॉक्टर नर्सेस लस घेऊन तयार आहेत. पण, लोकंच लस घ्यायला जात नाहीत. तर, काय करावं असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, अनेक ठिकाणी विविध विकास कामाच्या उद्घाटनासाठी मला बोलावतात. मला बोलवायचं असल्यास जरूर बोलवा, पण विकासाकामे ही दर्जेदार आणि दमदार करा. विकासकामांमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचं लक्ष असायला हवं. लोकांच्या घामाच्या कष्टातून पैसा येतो हे आपण विसरता कामा नये असा चिमटा देखील त्यांनी कार्यकर्त्यांना काढला.

औसा शहराच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांची गरज आहे. मी राज्याचा अर्थमंत्री आहे मागच्या वेळी सारखं डॉ.अफसर शेख यांना निवडून द्या मी 100 कोटी रुपये विकास कामाला देतो अस अभिवचन त्यांनी दिले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

करिना- ऐश्वर्याशी तुलना, बेदीच्या मुलीने मार्केट खाल्लं, फोटो झाले तुफान व्हायरल

Beed : दिवाळीत गोरगरिबांना किडे, बुरशीयुक्त तांदूळाचे वाटप; बीड तालुक्यातील संतापजनक प्रकार

Pune Shaniwar Wada : पुण्यातील शनिवारवाड्यात नमाज पठण? Video

आंघोळ कधी वापरतात माहितीये का? तुम्हीही चुकीचा शब्द वापरताय

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मोठा मनस्ताप|VIDEO

SCROLL FOR NEXT