मी मदत करणारा मुख्यमंत्री, पॅकेज मुख्यमंत्री नाही Saam tv news
महाराष्ट्र

मी मदत करणारा मुख्यमंत्री, पॅकेज मुख्यमंत्री नाही

आता काही कठोर निर्णय घ्यावे लागलीत, नाहीतर संकटे पाठ सोडणार नाहीत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मी पॅकेज मुख्यमंत्री नाही मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्राला ज्याची गरज आहे, तेच मी केंद्राकडे मागणार, वेडेवाकडे काहीही मागणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy Rain) तडाखा बसला आहे. या पार्श्वभुमीवर आज मुख्यमंत्री उद्वव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी आज कोल्हापूरातील शाहुवाडीच्या (Shahuwadi) पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी आपत्तीग्रस्त भागातील नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी माध्यामांशी संवाद साधला.

- आता कठोर निर्णय घ्यावे लागतील

माझ्या दौऱ्यात लोक म्हणाले हे दरवर्षी होत आहे. असे किती वर्षे चालणार. आता अशा भागांतील नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करायचे आहे. त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. नाहीतर संकटे पाठ सोडणार नाहीत. यापुढे नदीपात्रातील बांधकामे होणार नाहीत. ब्लू लाईन, रेड लईन बांधकामांना परवानगी दिली जाणार नाही. याशिवाय महाराष्ट्राला पूराच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी कायमस्वरुपी निर्णय घेतले जाणार आहेत. त्यासाठी आराखड्यांचे काम सुरु आहे.

- भिंत बांधण्याचा पर्याय

राज्यात पुराचं भीषण वास्तव आहे. यावेळची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. काही दिवसांपुर्वी मला कोणीतरी भिंत बांधण्याचा पर्याय सुचवला होता. मात्र तो फक्त पर्याय होता. पूरग्रस्तांसाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. लवकरात लवकर त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. आता नद्यांना येणाऱ्या पुराचे नियोजन करायचे आहे. जर हे पाणी सुखरुप वाहून गेले तर ठिक नाहीतर या पाण्याचा दुसरीकडे कुठे उपयोग करता येईल का, याचेदेखील नियोजन करायचे आहे.

- देवेंद्र फडणवीस भेट

मी आणि देवेंद्र पडणवीस खुलेआम बोललो. तिथे बंद दरवाजाआड कोणतीही चर्चा झाली नाही. कारण पुराच्या पाण्यामुळे तिथे दरवाजेही खचले आहेत. राज्यावर दरवर्षी पुराचे संकट ओढावत आहे. अशा संकटावर कायमस्वरुपी मार्ग काढावा लागेल. त्यासाठी तुमच्याशी चर्चा करेल असे मी त्यांनी सांगितले आहे. आमचे तीन पक्ष आणि त्यांचा एक असे चारही मोठे पक्ष मिळून पूरसंकटावर चर्चा करु, त्यासाठी त्यांच्याही सुचनां आणि पर्याय ऐकून घेऊ. त्यातून जो निर्णय होईल तो शेवटचा असेल. राज्यातील पूरग्रस्ताना मदत करण्यासाठी मी कोणत्याही प्रकारचं राजकारण करायच नाही.

- यंदाचं संकट भयानक

मी जेव्हा राज्याच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावेळी तेथील पूराची परिस्थिती अत्यंत भीषण असल्याचे जाणवले. हवामान विभाग मान्सुनबाबत अंदाज वर्तवते. धोकादायक भागात इशारा देते. लोकांचे स्थलांतर केले जाते. पण राज्यातील परिस्थिती गंभीर होते. यावेळचे संकट फारच भयानक आहे. रस्ते खचले, दरडी कोसळल्या, पूर आला, लोकांची घरे, संसार उद्धवस्त झाले, आपलेच लोक गमावले. मात्र आता या संकटाचे कायमस्वरुपी नियोजन करावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kaam Trikon Yog: 18 वर्षांनी बनला काम त्रिकोण योग, 'या' 3 राशींना मिळणार भरपूर पैसा

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT