Husband's brother killed sister-in-law in Yavatmal Saam TV
महाराष्ट्र

Yavatmal News: शेतजमिनीचा वाद विकोपाला, दीराचं वहिनीसोबत भयानक कृत्य; १४ दिवसानंतर घटनेचा उगलडा

Yavatmal Crime News: यवतमाळ जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. मंगरुळ गावातून १४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह ऊसाच्या शेतात आढळून आला आहे.

Satish Daud

संजय राठोड, साम टीव्ही | यवतमाळ १६ डिसेंबर २०२३

Yavatmal Crime News

यवतमाळ जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. मंगरुळ गावातून १४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह ऊसाच्या शेतात आढळून आला आहे. पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार मृत महिलेच्या पतीने पोलिसांत दिली होती. त्यावरून यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतीच्या वादातून महिलेच्या दिरानेच तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. साधना संजय जोगे (वय ४० वर्ष) असं मृत महिलेचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी नाना उर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण जोगे (वय ४०) याला अटक केली आहे.

या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत साधना ३० नोव्हेंबरला नेहमीप्रमाणे शेतात गेली होती. सायंकाळी बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही.

त्यामुळे साधनाच्या पतीसह परिसरातील नागरिकांनी सर्वत्र तिचा शोध घेतला. मात्र, कुणालाही साधना दिसून आली नाही. दरम्यान, पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार संजय जोगे यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिसांत दिली. पोलिसांनी तातडीने तक्रारीची दखल घेत महिलेचा शोध सुरू केला.

दरम्यान, शुक्रवारी (१५ डिसेंबर) साधनाचा मृतदेह पोलिसांना एका ऊसाच्या शेतात आढळून आला. महिलेची हत्या तिच्या दिराने केली असावी, असा संशय पोलिसांना आला. त्यांनी तातडीने ज्ञानेश्वर जोगे याला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर आपणच वहिनीची हत्या केली अशी कबुली आरोपीने पोलिसांना दिली.

शेतीच्या हिस्स्याच्या वादात वहिनी अडथळा आणत होती. त्यामुळेच मी तिची हत्या केली, असं आरोपीने पोलिसांना सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर जोगे याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या जाणार अभिषेक बारणे यांच्या हातात, स्टॅंडिंग कमिटीसाठी भाजप कडून अर्ज दाखल

भिगवणमधील तरुणी आईकडे परतणार? कोर्टात जबाब बदलला, अचानक नेमकं काय घडलं?

परराज्यातील फुगे विकणाऱ्या अपघातग्रस्त मुलासाठी आयटी कर्मचारी धावले; स्वखर्चातून केली यशस्वी शस्त्रक्रिया

केरळनंतर आणखी एका राज्याचं नाव बदलणार? भाजप खासदाराचं गृहमंत्र्यांना पत्र

SBI Recruitment 2026: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये भरतीची शेवटची तारीख समोर, अजिबात चुकवू नका ५०,००० पगाराची नोकरी, अर्ज कसा करायचा? वाचा...

SCROLL FOR NEXT