Crime  
महाराष्ट्र

Solapur Crime: लाडक्या बहिणीच्या पैशातून दारू ढोसली; बायकोनं जाब विचारला, नवऱ्यानं कोयत्यानं केले वार

Husband Spends Ladki Bahin Yojana Funds: बायकोला मिळालेल्या लाडकी बहीण योजनेच्या पैशांवर तिच्या नवऱ्यानं डल्ला मारला. तसेच त्या पैशांनी तो दारू ढोसली. नंतर बायकोवर कोयत्याने वार केला.

Bhagyashree Kamble

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पैशांमुळे कुटुंबात कलह निर्माण झाल्याची घटना समोर आलीय. बायकोला मिळालेल्या लाडकी बहीण योजनेच्या पैशांवर तिच्या नवऱ्यानं डल्ला मारला. तसेच त्या पैशांनी तो दारू प्यायला. लाडकी बहीण योजनेचे पैसे दारूवर खर्च का केले? असा जाब बायकोनं विचारला असता, पती आणि सासूनं थेट कोयत्यानं वार करत महिलेवर प्राणघातक हल्ला केला. ही धक्कादायक घटना सोलापुरात घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सोलापुरातील माढा तालुक्यातील कुर्डूवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोणी गाव आहे. या गावात हा भयानक प्रकार घडला. निशा लोंढे असं पीडित महिलेचं नाव आहे. पती धनाजी लोंढे आणि सासू रूपाबाई लोंढे अशी गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. निशा यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता मिळाला होता. त्यांनी हे पैसे घरखर्चासाठी जपून ठेवले होते.

मात्र, निशाच्या नवऱ्यानं परस्पर ते पैसे काढून घेतले. त्यानंतर बायकोनं पैसे काढून का घेतले? असा प्रश्न नवऱ्याला विचारले असता, रागाच्या भरात पती आणि सासूनं तिच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. पीडित महिलेनं त्यानंतर कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

त्यानुसार पोलिसांनी पीडित महिलेचा पती आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT