Crime news Saam Tv
महाराष्ट्र

Chakan: मेदनकरवाडीत साता-याच्या युवकाने पत्नीस भाेसकले; पोलीस घटनास्थळी दाखल

घटनास्थळी चाकण पोलीस दाखल झाले आहेत.

रोहिदास गाडगे

चाकण : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा लेकीसमोरच निघृण खून केल्याची धक्कादायक घटना चाकण औद्योगीक नगरीत (chakan midc) घडली आहे. या घटनेतील संशयिताचा तपास चाकण पाेलीस (chakan police) करीत आहेत. (chakan midc latest marathi news)

सातारा (satara) जिल्ह्यातुन नोकरीसाठी आलेल्या सचिन काळेत आणि आश्विनी काळेत यांचा येथे सुखी संसार सुरु होता. या सुखी संसारात त्यांच्या समवेत पाच वर्षाची चिमुकली देखील आहे. परंतु सचिन आणि आश्विनी यांच्या सुखी संसारावर चारित्र्य संशयाचे भुत बसले आणि दोघांमध्ये वाद सुरु झाला. हा वाद इतका विकोपाला गेला कि पती सचिनने आज (मंगळवार) दुपारी चाकण येथील मेदनकरवाडी (medenkarwadi) येथील घरात मुलीसमोरच पत्नी आश्विनीवर चाकुने हल्ला केला.

यामध्ये आश्विनी गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यु झाला. त्यानंतर सचिन काळेत हा त्याच्या मुलीस घरीच साेडून तेथून फरार झाला. दरम्यान घटनास्थळी चाकण पोलीस (police) दाखल झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Automobile Tips : कारमधून सतत पेट्रोल डिझेलचा वास येतोय? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या

Veg Non Veg Label: शॅम्पू, टूथपेस्ट आणि साबणवर येणार व्हेज, नॉन व्हेजच लेबल; सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी, नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल

Wednesday Horoscope : अडथळे दूर होतील, कामाच्या ठिकाणचा ताण वाढेल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

SCROLL FOR NEXT