Jalna News Saam Tv
महाराष्ट्र

Jalna Crime News : पत्नी 8 महिन्यांपासून माहेरी राहत होती, पतीनं सासरवाडीत येऊन केलं भयंकर कृत्य

पतीने पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Jalna Crime News Update : जालन्यात धक्कादायक घटना घडली आहे. आठ महिन्यांपासून माहेरी राहत असल्याने रागाच्या भरात पतीनं सासरवाडीत जाऊन तिची गळा चिरून हत्या केली. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. (Jalna News)

मिळालेल्या माहितीनुसार, जालना तालुक्यातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंबेफळ गावात ही धक्कादायक घटना घडली. पतीने पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे.  (Maharashtra News)

आरोपी सासुरवाडीत आला. त्यानं पत्नीचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून केला. रमाबाई लाला कदम असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या पतीनेच तिची गळा चिरून हत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.

दोघांत वाद होत असल्याने आठ महिन्यांपासून रमाबाई माहेरी होती. त्याचवेळी आरोपी तिथे आला. रमाला घेऊन जायला आलोय असं त्यानं सांगितलं. सासू-सासरे शेतात जाताच आरोपीनं पत्नीवर शस्त्रानं वार केले. हत्या केल्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पोहोचले.

महिलेची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. वृत्त हाती येईपर्यंत तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

Vivekanand Patil: भाषणानं MPSC आंदोलन गाजवलं, महाराष्ट्रात चर्चा, कोण आहेत हे विवेकानंद पाटील?

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT