Suresh Shivaji Shinde risking life during Madha floods to rescue elderly Sikandar Sayyad trapped inside a mosque. Saam Tv
महाराष्ट्र

Hindu rescues Muslim: संकटात एकच धर्म मानवतेचा, मशिदीत अडकलेल्या वृद्धासाठी धावला हिंदू

Flood Havoc in Madha: अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे होत्याचं नव्हतं झालंय. आता मदतीचे हात पुढे येतायेत. मात्र माढ्यामध्ये महापुराच्या प्रसंगात मानवतेचा धर्म दिसून आला.

Girish Nikam

राज्यात अतिवृष्टीने हाहाकार उडालाय. बळीराजाचा आक्रोश मन हेलावून टाकणार आहे.अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे. कोरोना, भूकंप या काळात महाराष्ट्राने ते अनुभवलेही आहे. त्याचा पुन्हा प्रत्यय सोलापूरमधील माढा तालुक्यात आला. सीना नदीने रौद्ररुप धारण केलं होत. नदीकाठच्या दारफळ गावात तर पुराने होत्याचं नव्हतं केलं. हे दृश्य पाहा....गावाला पुराच्या पाण्याने कसा वेढा दिलाय. याचवेळी गावातल्या मशिदीमध्ये सिकंदर सय्यद ही वृध्द व्यक्ती अडकून पडली होती. बांधकाम सुरू असल्याने मशिद तात्पुरती धर्मशाळेत सुरू केलेली आहे. सय्यद दररोज इथेच झोपतात. मध्यरात्रीनंतर मशिदीमध्ये पूराचे पाणी शिरले. पाणी अगदी छातीपर्यंत आले. मदतीसाठी कोणी नाही. रात्र त्यांनी कशीतरी काढली. मात्र पहाटे त्यांच्या ओरडण्याने लोकांना माहिती मिळाली. यावेळी सुरेश शिवाजी शिंदे या वक्तीने जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून पोहत जात मशिद गाठली. छतावर जाऊन पत्रा उचकटून सैय्यद यांना बाहेर काढलं.

महापुरातील हा प्रसंग पाहिल्यावर

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे

माणसाने माणसाशी माणसासम वागणे

धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे

एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे

कवी समीर सामंत यांच्या प्रार्थनेतील भाव आठवतात. सध्या समाजात द्वेषाची लढाई आणि जाती-धर्मात विखारी संघर्ष सुरु आहे. त्यामुळे जात, धर्माच्या पलीकडे जाऊन मदतीचा हात पुढे येणे कौतुकास्पद आहे. माढ्याच्या पुरातील हे चित्र सर्वत्र पहायला मिळो हीच अपेक्षा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women World Cup Final: हातात तिरंगा आणि पाणावलेले डोळे! एकमेकींना मिठी मारल्यानंतर हरमनप्रीत-स्मृतीला अश्रू अनावर

Rohit Sharma Reaction: रोहितला आठवला 19 नोव्हेंबर? महिलांनी वर्ल्डकप जिंकताच स्टँडमध्ये बसलेला हिटमॅन भावूक; रिएक्शन होतेय Viral

हरमनप्रीत कौरचा जबरदस्त डाव; त्या दोन षटकांत गेम फिरला, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या हातून ट्रॉफी हिसकावली

ICC Women World Cup: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; भारताला अन् उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला किती मिळणार पैसा?

IND W vs SA W Final: ५२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महिलांनी लिहिला इतिहास; टीम इंडियाच्या तीन खेळाडूंनी बदलली फायनलची कहाणी

SCROLL FOR NEXT