'या' हॉटेल मालकाची अशीही माणुसकी, 20 वर्षांपर्यंत मुलांना देणार हजार रुपये महिना SaamTv
महाराष्ट्र

'या' हॉटेल मालकाची अशीही माणुसकी, 20 वर्षांपर्यंत मुलांना देणार हजार रुपये महिना

अकोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जवळील मराठा हॉटेल वेगवेगळ्या उपक्रमांनी नेहमीच चर्चेत येत आहे. मोदींच्या 'मन की बात' मधून नामोल्लेख झालेले हे हॉटेल आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जयेश गावंडे

अकोला - अकोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जवळील मराठा हॉटेल वेगवेगळ्या उपक्रमांनी नेहमीच चर्चेत येत आहे. मोदींच्या मन की बात मधून उल्लेख झालेले हे हॉटेल आहे. मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात या हॉटेलचे मालक मुरलीधर राऊत यांनी परराज्यात पायी जाणाऱ्याना मोफत पोटभर जेवण देऊन सेवा केली होती.

त्यानंतर अनाथ मुलांचे स्वखर्चाने लग्न लावून सामाजिक बांधिलकी जपली. आता हे हॉटेल पुन्हा नव्याने चर्चेत आले आहे, ते म्हणजे, कोरोना काळात आईवडिलांचे छत्र हरविलेल्या पाल्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेऊन. Humanity of hotel owner, will give a thousand rupees a month to children for 20 years

हे देखील पहा -

लहान मुलांना 20 वर्षांपर्यंत हजार रुपये महिना आणि त्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी मुरलीधर राऊत यांनी उचलली आहे. बाळापूर तालुक्यातील दहा मुलांचे ते आईवडील झाले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांच्या मित्रांनी हा उपक्रम कार्यक्रम रुपात साजरा केला. सन्मानपूर्वक या मुलांना हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून मुरलीधर राऊत हे हॉटेलच्या कमाईतून समाजकार्य करण्याचा ध्यास घेऊन जीवन जगत आहेत. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी ठरत आहे. कोरोनाच्या महामारीत नातेगोते विसरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर मात्र काळ सावरत गेला.

आता तर मदतीचा हात पुन्हा समोर येत आहे. याच मदतीच्या माध्यमातून मुरलीधर राऊत यांनी सामाजिक दायित्व समजून आपलेही समाजाला काही देणे आहे, ही जाण ठेवली. म्हणून ते आई वडील यांचे छत्र हरविलेल्या मुलांच्या मदतीसाठी समोर आले आहेत. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: ५ राज्यात कोणाचं सरकार होणार? विधानसभा निवडणुकांचा धक्कादायक सर्व्हे आला समोर

Daund Firing Case: दौंड गोळीबार प्रकरण; आमदाराच्या भावाला अटक करा; तृप्ती देसाईंची मागणी

फडणवीसांचा शिंदे-दादांना झटका,नगरविकास'च्या उधळपट्टीला फडणवीसांकडून चाप?

Online Gaming Maharashtra: ऑनलाईन रमीच्या नादात घरदार, शेती गमावली; डोक्यावर झालं 80 लाखांचं कर्ज

High BP: हाय बीपीचा त्रास असल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे

SCROLL FOR NEXT