Beed News Saam Tv
महाराष्ट्र

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मानवी हक्क आयोगाचे समन्स

13 जून रोजी आयोगासमोर उपस्थित राहण्याचे आदेश

विनोद जिरे

बीड - हिंगणगावमधील मयत ऊस उत्पादक शेतकरी नामदेव जाधव यांनी केलेल्या आत्महत्येची दखल आता मानवी हक्क आयोगाने घेतली आहे. या प्रकरणात बीडच्या (Beed) जिल्हाधिकाऱ्यांसह साखर आयुक्तांना समन्स बजावण्यात आले आहेत. हिंगणगाव शेतकरी (Farmer) आत्महत्या प्रकरणी तातडीने अहवाल देण्याचे आदेश आयोगाने दिले असून 13 जून रोजी आयोगासमोर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

हे देखील पाहा -

गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी, नामदेव जाधव यांनी उसाच्या फडाला आग लावून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अतिरिक्त ऊसाची प्रशासनाने दखल न घेतल्याने ही आत्महत्या झाल्याचे माध्यमांनी मांडले होते. आता मानवी हक्क आयोगाने या आत्महत्येची स्वतःहून दखल घेतली आहे.

या प्रकरणात तातडीने अहवाल दाखल करण्याचे आदेश आयोगाने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांसह राज्याच्या साखर आयुक्तांना दिले आहेत. या प्रकरणात 13 जून रोजी पुढील सुनावणी होणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी आणि साखर आयुक्तांनी हजर रहावे म्हणून आयोगाने समन्स बजावले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT