HSC RESULT UPDATE | निकाल नक्की कसा पाहाल?; विद्यार्थ्यांनो हा पहा व्हिडिओ  Saam Tv
महाराष्ट्र

HSC RESULT UPDATE | निकाल नक्की कसा पाहाल?; विद्यार्थ्यांनो हा पहा व्हिडिओ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२१ मध्ये १२ वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंगळवारी दुपारी ४ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

HSC Result 2021: पुणे : महाराष्ट्र Maharashtra राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२१ मध्ये १२ वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा students निकाल Result मंगळवारी दुपारी ४ वाजता ऑनलाइन Online जाहीर करण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या १२वीच्या निकालाची तारीख राज्य मंडळाने जाहीर केल्याने लाखो विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

राज्य मंडळाच्या २०२१ मध्ये १२ वीच्या परीक्षेसाठी राज्यामधील नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकालात बघता येणार आहेत. २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेली १२ वीची परीक्षा राज्य सरकारच्या निर्णयामुळे रद्द करण्यात आली होती. यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यांचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे.

पहा व्हिडिओ-

तसेच २०२१ मध्ये १२ वीच्या परीक्षेच्या श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार झालेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या २ संधी मधील या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील संधी उपलब्ध राहणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी यावेळी दिली आहे.

१० वीच्या निकालाच्या वेळेस एकच संकेतस्थळ उपलब्ध असल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाले होते. परिणामी विद्यार्थ्यांना वेळेत निकाल बघता आले नाही. या पार्श्वभूमीवर १२ वीचा निकाल बघण्यासाठी राज्य मंडळामार्फत एकापेक्षा जास्त लिंक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाची सांख्यिकीय माहिती " www.mahresult.nic.in" आणि " https://msbshse.co.in" या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे, असेही राज्य मंडळानी माहिती दिली आहे.

सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार जाहीर केलेल्या १२ वीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांचे आक्षेप, तक्रारी नोंदविण्याकरिता आणि त्यांचे निराकरणासाठी राज्य मंडळामार्फत संबंधित विभागीय मंडळ स्तरावर तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी विभागीय मंडळामधील विभागीय सहसचिव हे तक्रार निवारण अधिकारी म्हणून काम बघणार आहेत.

संबंधित विद्यार्थी आपला तक्रार अर्ज टपाल, ई- मेल किंवा व्यक्तिशः भेटून संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करू शकणार आहे. अर्जाचा नमुना "www.mahahsscboard.in" या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. तक्रार निवारण अधिकारी कार्यालयीन कामाच्या १० दिवसांत अर्ज निकाल काढून, विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निवारण करणार आहेत. विद्यार्थ्यांना उत्तराबाबत काही अडचणी निर्माण असल्यास त्यांनी संबंधित विभागीय मंडळामधील विभागीय सचिव, विभागीय अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाने यावेळी केले आहे.

निकाल बघण्यासाठी लिंक

१) https://hscresult.11thadmission.org.in

२) https://msbshse.co.in

३) hscresult.mkcl.org

४) mahresult.nic.in

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, तिकडे काश्मीरमध्ये ऑपरेशन महादेव; पहलगाम हल्ल्याचा बदला, मास्टरमाइंडचा खात्मा

Nandurbar : पंचायत समिती इमारतीच्या भूमीपूजनावरून श्रेयवादाची लढाई; भाजप- शिवसेना आमने सामने

Income Tax Return: सोशल मीडियावर कमाई करणाऱ्यांना किती द्यावा लागतो टॅक्स? कोणता ITR फॉर्म भरावा लागतो?

Maharashtra Live News Update: मनसेकडून उत्पादन शुल्क विभाग निरीक्षकांना दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याचा प्रयत्न

Shravan Vegetable: श्रावणात भेंडी, करटोली, घेवडा खा अन् आरोग्य सांभाळा

SCROLL FOR NEXT