कोरोनामुळे शिर्डीतील हॉटेल व्यवसाय ठप्प, हजारो तरुण झाले बेरोजगार Saam Tv News
महाराष्ट्र

कोरोनामुळे शिर्डीतील हॉटेल व्यवसाय ठप्प, हजारो तरुण झाले बेरोजगार

गोविंद साळुंके

शिर्डी - कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील साईबाबांचे मंदिर (sai baba temple shirdi) गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. शिर्डीत भाविक येत नसल्याने शिर्डीतील हॉटेल (hotels in shirdi) ओस पडली आहेत. शिर्डीतील अर्थकारण साईबाबांच्या मंदिरावर अवलंबून असतं, तसेच शिर्डीमध्ये प्रमुख व्यवसाय हा हॉटेल व्यवसाय आहे, शिर्डीत दुसरी कोणतीही बाजारपेठ नाही. छोटे मोठे शेकडो हॉटेल रेस्टॉरंट शिर्डी मध्ये आहेत, त्यावर शिर्डीकर आपली उपजीविका भागवत असतात. मात्र गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे (corona pandemic)17 मार्चला साईबाबांचे मंदिर बंद झालं आणि आठ महिने साईबाबांचे मंदिर बंद होतं. पुन्हा दुसऱ्यांदा कोरोनाने (corona second wave) डोकं वर काढल्याने गेली चार महिन्यांपासून साई मंदिर बंद आहे. त्यामुळे शेकडो हॉटेलमध्ये काम करणारे हजारो तरुण बेरोजगार (unemployment) झाले आहेत. (hotel business is collapse in shirdi due to corona pandemic)

हे देखील पहा -

गेल्या दीड वर्षांपासून शिर्डीतील अर्थकारण ठप्प झालं आहे. अनेक हॉटेल चालकांनी कर्ज काढलं असून वीज बिल भरता येत नाही. बँकेचं व्याज वाढतंय त्यामुळे राज्य शासनाने काही निर्बंध घालून विशेष नियमावली करून साईमंदिर सुरू करावं अशी मागणी शिर्डीतील हॉटेल व्यावसायिकांसह साईभक्त करत आहे. साई मंदिरासोबत मंदिराशी जोडले जाणारे अर्थकारण महत्त्वाच आहे. राज्य सरकार त्याच दृष्टीने काही पावलं उचलत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अँजिओप्लास्टीनंतर पहिल्यांदाच समोर, एक शब्द अन् कार्यकर्त्यांमध्ये भरला उत्साह; पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: माजी मंत्री आमदार राजेद्र शिंगणे यांना अजित पवारांचा फोन

VIDEO : फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करण्याचं धाडस भाजपात नाही; रोहित पवारांची जोरदार टीका

Kalyan : सुट्ट्या पैशांवरुन वाद टोकाला; रागाच्या भरात प्रवाशाची महिला बुकिंग क्लार्कला बेदम मारहाण, कल्याण रेल्वे स्टेशनवरील घटना

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचा महायुती, नारायण राणेंना मोठा धक्का; राज्यातील २ दिग्गज नेत्यांनी हाती धरली मशाल, कशी असेल लढाई?

SCROLL FOR NEXT