Hot Tea Spill On Girl Saam TV
महाराष्ट्र

Hot Tea Spill On Girl: गरम चहा सांडल्याने चिमुकली भाजली; रुग्णालयात उपचार सुरू, पंचतारांकित हॉटेलमधील घटना

Mumbai Crime News: उकळता गरमगरम चहा अंगावर सांडल्याने तीला गंभीर दुखापत झाली आहे.

Ruchika Jadhav

Andheri 5 Star Hotel Crime:

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये छोट्याशा अपघातात एक ७ वर्षीय चिमुकली भाजली आहे. हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले असता वेटरकडून मुलीच्या अंगावर चहा सांडला. उकळता गरमगरम चहा अंगावर सांडल्याने तीला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यातल आले असून उपचार सुरू आहे. (Latest Marathi News)

मुंबईमधील अंधेरीच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. घटनेनंतर मुलीच्या पालकांनी सहारा पोलीस ठाण्यात धाव घेतली. नोंदवलेल्या तक्रारीनुसार, २९ सप्टेंबर जोजी ३३७ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

जैन कुटुंबियांनी या हॉटेलमध्ये २४ सस्टेंबर रोजी एक रुम बुक केली होती. त्यानंतर २९ सप्टेंबरला ते हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी आले होते. येथे आल्यावर त्यांच्यासोबत पत्नी, १४ वर्षांची सारा आणि ७ वर्षांची मायरा होती. मायरा तिला हवा असलेला नाश्ता घेऊन येत होती.

यावेळी हॉटेलमधील एक वेटर गरम चहाची किटली घेऊन जात होती. यावेळी वेटरला मायरा दिसली आणि दोघींची एकमेकींना जोरदार धडक बसली. या धडकेत मायराच्या डाव्या हातावर चहा सांडून ती जखमी झाली. ती जोरजोरात ओरडू लागली. यावेळी वेटर तिच्या अंगावर ओरडली देखील, असं एका प्रत्यक्षदर्शीने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT