Horse racing competition held for the first time in Latur district.
Horse racing competition held for the first time in Latur district. saam tv
महाराष्ट्र

Shivjayanti: अश्व दाैड स्पर्धेत अंबेजोगाई, बेलकुंड, परभणी, अहमदपूरकरांची बाजी

दीपक क्षीरसागर

लातूर : बेलकुंड येथे झालेल्या अश्व दौड (horse riding) स्पर्धेत (competition) मोठ्या गटात अंबाजोगाईच्या (ambajogai) हुसेन गवळी यांच्या बुलेटने तर लहान गटात बेलकुंडमधील विष्णू कोळी यांच्या बाहूबली या अश्वाने प्रथम क्रमांक मिळविला. या भागात (latur) प्रथमच अश्व दौड स्पर्धा आयाेजिल्याने ती पाहण्यासाठी नागरिकांची माेठी गर्दी झाली होती. (latur latest marathi news)

शिवजयंतीनिमित्त (shivjayanti) आयाेजिलेल्या या स्पर्धेत ३५ अश्वांचा सहभाग होता. ५०० मीटरच्या दोन ट्रॅकवर स्पर्धा झाली. रसिकांनी स्पर्धेत उतरलेल्या अश्वांना (horse) आणि त्यांच्या मालक-चालकांना टाळ्या आणि शिट्या वाजवून दाद दिली.

या स्पर्धेत मोठ्या गटात अंबाजोगाईच्या (ambajogai) हुसेन गवळीच्या बुलेटने, वसीम अन्सारी (परभणी) यांच्या जासुसने तर सुलतान खोरीवाले (लातूर) यांच्या हिरो अश्वाने पहिले तीन क्रमांक मिळविले. लहान गटात बेलकुंडमधील विष्णू कोळी यांच्या बाहूबलीने, सय्यद अफजल खैराती (अहमदपूर) यांच्या वीरने तर शाहजान खोरीवाले यांच्या टायगरने पहिले तीन क्रमांक मिळविले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

SCROLL FOR NEXT