Maharashtra Amravati road accident news  Saam
महाराष्ट्र

Amravati : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, बाप-लेकीचा जागीच मृत्यू, कारने दुचाकीला ५० फूट उडवले

Maharashtra Amravati road accident news : अमरावती जुन्या बायपास रोडवर भीषण अपघात, भरधाव कारने दुचाकीला धडक बाप लेकीचा मृत्यू, मद्यधुंद चालकामुळे अमरावती अपघात, दुचाकीस्वार ५० फूट उडाले अपघात घटना, अमरावती अपघातानंतर फरार चालकाचा शोध

Namdeo Kumbhar

अमर घटारे, अमरावती प्रतिनिधी

father and daughter killed in Amravati road accident old bypass road : अमरावतीच्या जुन्या बायपास रोडवर रविवारी रात्री एका भीषण रस्ते अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आनंद मार्बल फॅक्टरीसमोर एका भरधाव वेगात असणाऱ्या कारने दुचाकीला जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघेही जण हवेत उडून ५० फूट लांब फेकले गेले. या अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी गंभीर जखमी आहे.

या थरारक अपघातात गजानन माकोडे आणि त्यांची मोठी मुलगी सपना यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी प्रियंका माकोडे हिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. अपघातानंतर तो गाडी सोडून फरार झाला आहे. पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन श्रीराम माकोडे (५५) हे आपल्या दोन मुली सपना माकोडे (२४) आणि प्रियंका माकोडे (२३) यांच्यासह दुचाकीने जात होते. जुन्या बायपास रोडवरील आनंद मार्बल फॅक्टरीसमोरून जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या एका भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघेही हवेत उडून रस्त्यापासून सुमारे ६० फूट लांब फेकले गेले.

अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार, कारमधील तरुण मद्यधुंद अवस्थेत होता. कार अतिशय वेगात होती. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून काहीजणांकडून संतापही व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. फरार कार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वाशिम मनसेची समृद्धी महामार्गावर आपात्कालीनचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला मारहाण

Crime news: बाबानं माझ्यावर बलात्कार केला...! मुलगी रस्त्यावर भीतीनं पळत सुटली, साधूवरील गंभीर आरोपांनी खळबळ

Pune Mall threat : पुण्यातील मॉल उडवून देण्याची धमकी, तो मेल कोणी केला?

Pune BJP : भाजपचा स्थापना दिवस अन् अनधिकृत फ्लेक्सची बजबजपुरी, पुणे महापालिका कारवाई करणार?

Kalyan Tourism : कल्ला मस्ती ऑन द वे! वीकेंडला फिरा 'कल्याण'जवळील 'हे' पिकनिक स्पॉट्स, प्लान करा Summer ट्रिप

SCROLL FOR NEXT