raigad shocking  Saam tv
महाराष्ट्र

Horrific Incident : महाराष्ट्र हादरला; ८० वर्षांच्या म्हाताऱ्याकडून ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

raigad crime news : रायगडमध्ये राज्याला हादरवणारी घटना घडली आहे. रायगडमध्ये ८० वर्षांच्या म्हाताऱ्याकडून ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

Saam Tv

सचिन कदम, साम टीव्ही

रायगड : महाराष्ट्राला हादरवणारी घटना रायगडमध्ये घडली आहे. रायगडच्या माणगावमध्ये ८० वर्षांच्या म्हाताऱ्याने चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ८० वर्षीय म्हाताऱ्याने केलेल्या कृत्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील चिमुकली ते ज्येष्ठ महिला अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. वाढत्या अत्याचारांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील रायगडमध्ये तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची भयंकर घटना घडली आहे. तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

गोरेगावातील ८० वर्षीय म्हाताऱ्याने १७ मार्च रोजी चिमुकलीवर अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता ६५ आणि ५४ नुसार गुन्हा नोंदवला आहे. तर पोस्को अंतर्गतही गुन्हा नोंदवला आहे. आरोपी म्हाताऱ्याने पीडित मुलीला चॉकलेटचे आमिष देऊन घरात बोलावलं. त्यानंतर आरोपीने चिमुकलीवर अत्याचार केला. आरोपीच्या कृत्यानंतर परिसरातील नागरिकांकडून एकच संताप व्यक्त केला जात आहे.

सांगलीत बापाकडून लेकीवर अत्याचार

सांगलीच्या जत तालुक्यात उमदी परिसरातील गावात अत्यंत घृणास्पद प्रकार घडला आहे. सांगलीत १३ वर्षीय लेकीवर बापानेच अत्याचार केल्याचा घटना घडली आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी संशयित आरोपी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसांनी नराधमास गजाआड केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suhasini Mulay: सोशल मीडियावरून जुळल्या मनाच्या तारा; ६०व्या वर्षी प्रेमात पडली अभिनेत्री, अवघ्या ७५ दिवसांत बांधली लग्नगाठ

तांदूळ, ज्वारी की बाजरी? डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती भाकरी खावी?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मनमाड नगरपरिषदेची उद्या पोटनिवडणूक

Cable Stayed Bridge : खुशखबर! ठाणे-नवी मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार; कोपरी ते पटनीदरम्यान पूल उभारला जाणार, कसा असेल मार्ग?

'पाणी द्या, अन्यथा...'; डोंबिवलीकरांचा पाणीटंचाईवरून संताप, महिलांचा पालिकेवर हंडा-कळशी मोर्चा

SCROLL FOR NEXT