Beed Accident Saam Tv
महाराष्ट्र

Beed Accident: बीडमध्ये कंटेनरने ९ जणांना चिरडलं, ६ जणांचा जागीच मृत्यू; अपघाताचा थरारक VIDEO

Beed Accident CCTV: बीडमध्ये कारला अपघात झाला. त्यामुळे कारमधील सर्वजण बाहेर येऊन रस्त्यावर उभे राहिले. यावेळी त्यांना पाठीमागून आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Priya More

बीडमध्ये सोमवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातामध्ये ६ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी फाट्याजवळ हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

बीडच्या गेवराई तालुक्यातील गढी परिसरात रात्री उशिरा हा अपघात झाला. सुरुवातीला पाण्यामुळे कारला अपघात झाला. ही कार डिव्हायडरवर चढली. अपघात झाल्यामुळे कारमधील सर्व जण खाली उतरले आणि रस्त्याच्या कडेला उभे राहिले. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने सात जणांना चिरडले. या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर तर दोन किरकोळ जखमी झाले.

या अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण गेवराई तालुक्यातील होते. अपघातानंतर रस्त्यावर अक्षरश: रक्ताचे पाट वाहत होते. या अपघातामध्ये बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण एकाच ठिकाणचे होते. त्यांच्या निधनाने गेवराईवर शोककळा पसरली आहे. या अपघाताचा तपास बीड पोलिसांकडून सुरू आहे.

या अपघाताची माहिती मिळताच बीड पोलिसांनी आणि आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. सर्वांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. या अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला होता. पोलिसांनी या कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

SCROLL FOR NEXT