Washim Accident News Saam TV
महाराष्ट्र

Washim Accident News: वाशिम-रिसोड मार्गावर भयानक अपघात; बोलेरो पिकअपच्या धडकेत तिघांचा मृत्यू

Washim Accident News: बोलेरो पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मनोज जयस्वाल, साम टीव्ही

Washim Accident News: वाशिम जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या बोलेरो पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना वाशिम-रिसोड रोडवरील नागठाणाजवळ सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. (Latest Marathi News)

अपघाताची (Accident) माहिती मिळताच स्थानिकांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत्युमुखी पडलेले तिन्ही व्यक्तींची ओळख पटलेली नसून प्राथामिक माहितीनुसार, मृत येवती गावचे रहिवाशी असल्याचं समजते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येवती (Washim News) गावातील रहिवाशी असलेले तिन्ही युवक हे कामानिमित्त दुचाकीवरून बाहेरगावी निघाले होते. वाशिम-रिसोड रोडवरील ते आले असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती, की दुचाकीने अचानक पेट घेतला. या अपघातात दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. स्थानिकांकडून अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (police) घटनास्थळी धाव घेतली.

गंभीर अवस्थेत असलेल्या एका युवकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात जाण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT