Accident, nagar, kalyan saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच; चारचाकीचा भीषण अपघात

वाशिमच्या कारंजा नजीक समृद्धी महामार्गावर चारचाकीचा भीषण अपघात झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Samruddhi Mahamarg Accident : नागपूरच्या दिशेने सुसाट जाणाऱ्या कारचे टायर फुटले, त्यामुळे कर चार कोलांट्या घेत विरुद्ध दिशेच्या कडेला जाऊन आदळली ही घटना ताजी असतानाच समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. मुंबई वरून नागपूरच्या दिशेने जात असताना वाशिमच्या (Washim) कारंजा नजीक समृद्धी महामार्गावर चारचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात एवढा भीषण होता की मृतक मुलगी ही कारच्या बाहेर उडून समृद्धी हायवे रोडच्या बाजूला खाली शंभर फूट अंतरावर जाऊन पडली होती. या अपघातातील सर्वजण नागपूर येथील असल्याची माहिती देण्यात येत आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. (Tajya News)

राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या महामार्गाचं लोकार्पण झाल्यापासूनच या महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग हा अपघातांचा महामार्ग झाला आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

समृद्धी महामार्गाची वैशिष्टये -

• लांबी ७०१ किमी • एकूण जमीन : ८३११ हेक्टर • रुंदी : १२० मीटर • इंटरवेज : २४ • अंडरपासेस : ७०० • उड्डाणपूल : ६५ • लहान पूल : २९४ • वे साईड अमॅनेटीझ : ३२ • रेल्वे ओव्हरब्रीज : ८ • द्रुतगती मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा ताशी : १५० किमी (डिझाइन स्पीड) • द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा झाडांची संख्या : साडे बारा लक्ष • कृषी समृद्धी केंद्रे : १८ एकूण गावांची संख्या : ३९२ • प्रकल्पाचा अंदाजित खर्च: ५५ हजार कोटी रुपये • एकूण लाभार्थी : २३ हजार ५०० • वितरित झालेला मोबदला : ६ हजार ६०० कोटी रुपये • कौशल्य विकास प्रशिक्षणाचे लाभार्थी : ३५६ • द्रुतगती मार्गालगत सीएनजी/ पीएनजी गॅस वाहिनी : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत • ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

SCROLL FOR NEXT