Rohit Pawar questions government on call surveillance saamtv
महाराष्ट्र

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

Rohit Pawar questions government on call surveillance: आता मंत्र्यांचेच फोन टॅप होत असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र हा दावा कुणी केलाय? आणि खरंच मंत्र्यांचे फोन टॅप होत आहेत का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.

Bharat Mohalkar

राज्यातील मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची चर्चा असतानाच रोहित पवारांनी मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याचा दावा केलाय. इतकच नाही तर फोन टॅपिंगमुळेच मंत्र्यांचे फोन नॉट रिचेबल असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिलीय. खरंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना नाना पटोले, संजय राऊत, बच्चू कडू यांच्यासह मंत्रिमंडळातील नेत्यांचे तत्कालीन गुप्तचर विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून फोन टॅप केल्याचा दावा केला जात होता. आता पुन्हा एकदा रोहित पवारांनी थेट मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याचा दावा केल्याने राऊतांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

तर मंत्र्यांचे फोन टॅपिंग सुरु असल्याचा दावा केल्याने सरकारची कोंडी झालीय.. मात्र विरोधकांनी केलेला दावा प्रसिद्धीसाठी असल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलाय. अनेक मुद्यांवरुन महायुतीत धुसफूस सुरु आहे. सरकारमध्ये एकनाथ शिंदेंची नाराजी लपून राहिली नाही. त्यातच आता मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरु असतानाच फोन टॅपिंगची चर्चा सुरु झालीय. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन दूध का दूध आणि पानी का पानी होणार का? आणि मंत्र्यांमध्ये निर्माण होत असलेला अविश्वास कमी होण्यासाठी त्याचा फायदा होणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur: 'ती आता काम करत नाही, मी काम करतेय...'; बिपाशा बसूनंतर मृणाल ठाकूरने 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची उडवली खिल्ली

Maratha Protest: गोळ्या घातल्या तरी हटणार नाही, हायकोर्टाच्या आदेशानंतरही मराठा आंदोलक आक्रमक

भारतात कोणाला मिळतो पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट?

Manoj jarange patil protest live updates: मनोज दादा जरांगे यांच्या आरोग्याची सरकारने काळजी घ्यावी ; बजरंग सोनवणे यांची मुख्यमंत्र्यांनी मागणी

Sinhagad Fort History: इतिहास, शौर्य आणि निसर्गाचा अद्भुत संगम, पुण्याजवळील सिंहगड किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT