nanded shocking  Saam tv
महाराष्ट्र

वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; नांदेड शहरात खळबळ

nanded shocking : नांदेडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या तरुणीने आत्महत्या केली. तरुणीने टोकाचं पाऊल उचलल्याने नांदेड शहरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

होमिओपॅथीचे शिक्षण घेणाऱ्या युवतीने गळफास घेऊन केली आत्महत्या

विद्यार्थिनीच्या आत्महत्येने कॉलेजमध्ये खळबळ

पोलिसांकडून कारवाईला सुरुवात

नांदेड शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड शहरात होमिओपॅथीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. नांदेड शहराच्या हडको भागात ही घटना घडली. विद्यार्थिनीच्या आत्महत्येने कॉलेजमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे.

नांदेडच्या हडको येथील पद्मश्री शामराव कदम बी एच एम एस कॉलेजमध्ये 25 वर्षीय आकांक्षा गायकवाड ही विद्यार्थनी शिकत होती. ती राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पदाधिकारी असलेले जीवन घोगरे पाटील यांच्या निवासस्थानी इतर मुलींसोबत कॉट बेसिसवर राहत होती. आकांक्षाने रुममधील पंख्याला ओढणी बांधून दुपारी गळफास घेतल्याचे उघड झाले.

आकांक्षाने आत्महत्या केल्याचे कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामीण पोलीसांनी तात्काळ धाव घेत पंचनामा केला. आकांक्षाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. आकांक्षाने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आले नाही. मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करून गळफास दिल्याचा आरोप आकांक्षाच्या वडिलांनी केलाय. आकांक्षाने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलीस करताहेत.

जळगावमध्ये तरुणाने आयुष्य संपवलं

जळगावच्या एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथील तरुणाची सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. गौरव ज्ञानेश्वर बडगुजर असे आत्महत्या करणारा तरुणाचे नाव असून त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली. या चिठ्ठीत सासू, मेव्हणी, साडू यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. या प्रकरणी मृत तरुणाच्या सासू, मेव्हणीसह तीन जणांविरुद्ध कासोदा पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विदर्भातील पारा चाळीशीपार

UPSC Topper: आधी MBBS; डॉक्टर सोडून दिली UPSC; देशात रँक १ मिळवणारे अनुज अग्निहोत्री आहेत तरी कोण?

Upit Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा झटपट आणि चविष्ट उपीट, जाणून घ्या सोपी रेसिपी

आता रात्रभर चालणार बार; 5-स्टार हॉटेलबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवे नियम

Saturday Horoscope: अनावश्यक खर्च टाळा, मेहनतीचे फळ मिळेल; या ४ राशींसाठी शनिवार ठरणार लकी

SCROLL FOR NEXT