Home Price Hike Saam Tv
महाराष्ट्र

Home Price Hike: घराचे स्वप्न महागलं, आजपासून खरेदी-विक्रीचे व्यवहार महागले, कोणत्या शहरात काय स्थिती?

Home Price Hike News: घर खरेदी विक्री करणे आता महागणार आहे. सरकारने रेडीरेकनर दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे १ एप्रिलपासून घर खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

Siddhi Hande

आपले स्वतः चे हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मुंबई-पुण्यासारख्या शहरात घर घेणे हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीये. त्यात आता घर खरेदी करणे अजूनच महागणार आहे. आता रेडीरेकनर दरात वाढ झाली आहे. याचा परिणाम थेट घर खरेदी-विक्रीवर होणार आहे. (Home Price Hike)

राज्याचे नोंदणी महानिरिक्षक व नोंदणी नियंत्रकांच्या आदेशानुसार २०२२-२३ नंतर राज्यातील घर खरेदी विक्रीचे दर एप्रिलपासून महागणार होते. आता या दरात वाढ झाली आहे. महापालिका क्षेत्रात (मुंबई वगळून) रेडीरेकनर दरात ५.९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर ग्रामीण भागात ३.३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे १ एप्रिल म्हणजे आजपासून घरांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.

राज्यात गेल्या तीन वर्षात रेडीरेकनर दरात वाढ झालेली नव्हती. आता २०२५-२६ या आर्थिक वर्षात मुद्रांक शुल्क विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. घर व्यव्हाराचे दर वाढवसले आहे. यामध्ये राज्यात सरासरी ४.३९ टक्के असणार आहे.

फ्लॅटचे दर महापालिका क्षेत्रांसाठी जमीन व बांधकाम दरापेक्षा कमी असेल तर तेवढेच ठेवले जाणार आहे. याशिवाय ग्रामीण भागात फ्लटॅचे दर जर बांधकाम दराइतके असेल तर किमान बांधकाम दराइतकेच ठेवले आहे. जर याआधी घर खरेदी विक्रीच्या व्यव्हारासाठी १०० रुपये खर्च असेल तर त्यात ४ रुपयांनी वाढ झाली आहे.

राज्यात रेडीरेकनर दरात 4.39% वाढ झाली. मुंबईत 3.39% वाढ झाली तर मनपा क्षेत्रात 5.95%, ठाण्यात 6.26%, नाशिकमध्ये 7.32%, नवी मुंबईत 6.75%, सोलापुरात 10.17% व अमरावतीत 8.3% वाढ झाली.

रेडिरेकनचे दर हे प्रत्येक महापालिकेनुसार वेगवेगळे असतात. ग्रामीण, शहरी भागात हे दर वेगळे असतात. त्यामुळे तुम्ही जिथे घर घेता त्यावर तुमच्या घर खरेदी विक्रीच्या व्यव्हरात किती वाढ होणार हे ठरणार आहे. सध्या ग्रामीण क्षेत्रात रेडिरेकनर दरात ३.३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात ४.९६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महापालिका क्षेत्र ५.९५ टक्के तर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३.३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: व्हॅलेंटाईन वीक सुरू होताच बहरेल प्रेम; 'या' राशींच्या जीवनात प्रेमासह धनलाभाचे योग, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला अटक करा, अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मैदानात काय घडलं?

भाजपला मतदान करणं भोवलं; MIM च्या नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी, आता पदही जाणार

ठाकरे बंधूंना मोठा धक्का, शरद पवारांची राष्ट्रवादी भाजप-शिंदेसेना महायुतीसोबत

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील जाखले गावातील विहिरीत दोन बिबटे पडले

SCROLL FOR NEXT