ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पुणे हे सर्व गोष्टींच्या दृष्टीने अगदी परिपूर्ण आहे.
पुण्यात घर घेणे हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही. घरांच्या किंमतीसोबत घर भाड्यातही वाढ झाली आहे.
गेल्या तीन वर्षात पुण्यातील घरभाड्यात ५७ ते ६५ टक्के वाढ झाली आहे.
अनारॉक ग्रुपने एक अहवाल जारी केला आहे. त्यात पुण्यात घरांच्या किंमतीपेक्षा घर भाड्यात जास्त वाढ झाली आहे.
पुण्यात हिंजवडी आणि वाघोली परिसरात घरांच्या सर्वाधिक किंमती आहे. या भागात घरांचे भाडेदेखील खूप जास्त आहे.
हिंजवडीत २०२१ मध्ये घरभाडे १७,८०० रुपये होते. तर आता २८००० झाले आहे.
वाघोलीत २०२१ मध्ये घरभाडे १४२०० रुपये होते तर ते आता २३५०० झाले आहे.
हिंजवडीत गेल्या ३ वर्षात घरभाड्यात ५७ टक्के तर वाघोलीत ६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.