"कोरोना संकटात महाविकास आघाडी सरकारचा प्रत्येक घटक काम करतोय" रोहिदास गाडगे
महाराष्ट्र

"कोरोना संकटात महाविकास आघाडी सरकारचा प्रत्येक घटक काम करतोय"

गेल्या सहा महिन्यापासुन केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन काहीतरी निमीत्त काढुन महाविकास आघाडीच्या नेत्यांना योग्य आणि अयोग्य काय याचा विचार न करता खिंडीत आडवायचा प्रयत्न केला जातोय. असा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.

रोहिदास गाडगेखेड

खेड : कोरोनाचे संकट नियंत्रणात आलंय मात्र, दुस-या बाजुला कारखानदारी,सेवा व्यवसाय, सर्व्हिस सेंटर, शेती, या सर्व क्षेत्रात पिच्छेहाट झालीय. या क्षेत्रांना उभारी देण्याचे काम करत असताना केंद्र सरकारने एक कवडीची सुद्धा राज्याला मदत केली नसल्याचा गंभीर आरोप, मंचर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना दिलीप वळसे पाटलांनी केला आहे.

हे देखील पहा :

वेळ पडली तर कर्ज काढुन राज्यातील समस्या सोडविणार

राज्याचं बजेट कोरोना महामारी संकट काळात पूर्णपणे खर्च झालंय, तर दुसरीकडे केंद्र सरकार राज्याचे जीएसटीचे पैसे आणि इतर मदत द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीत राज्याचा कारभार करावा लागत असून वेळ पडली तर कर्ज काढून राज्यातील समस्या सोडविणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

राज्यात आवकाळी पाऊस, चक्रिवादळ, दुष्काळी संकट, या सर्व गोष्टींचा सामना करत शेतकरी अडचणीत आहे शेतकरी वर्गाला मदत देण्याची भुमिका ठेवून राज्याच्या विकासाचा गाडा पुढे घेऊन जात असताना गेल्या सहा महिन्यापासुन केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन काहीतरी निमीत्त काढुन महाविकास आघाडीच्या नेत्यांना योग्य आणि अयोग्य काय याचा विचार न करता खंडीत आढवायचा प्रयत्न केला जातोय. जो चुकीचा वागला असेल त्याच्यावर कारवाई करण्यास हरकत नाही. मात्र, भाजपाच्या एकाही नेत्यावर कारवाई होत नाही याचा अर्थ राजकिय दुष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन राज्यातील सरकार यांच्या डोळ्यात सलतंय आणि महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रांचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप गृहमंत्री दिलीप वळसेपाटीलांनी यांनी केलाय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT