Hisar Coimbatore AC Express Fire  Saam Tv
महाराष्ट्र

Hisar Coimbatore AC Express Fire : तळोजा जवळ कोयंबतूर हिस्सार एक्सप्रेस ला लागली आग, कोणतीही जीवितहानी नाही.

हिसार कोईम्बतूर एसी एक्सप्रेसच्या एका डब्ब्याला आग लागल्याची घटना घडली आहे.

अजय दुधाणे

Hisar Coimbatore AC Express Fire News : हिसार कोईम्बतूर एसी एक्सप्रेसच्या एका डब्ब्याला आग लागल्याची घटना घडली आहे. निळजे - तळोजा रेल्वे स्टेशन दरम्यान ही घटना घडली आहे. आगीची खबर मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, हिसार कोईम्बतूर एसी एक्सप्रेसच्या मालडब्याला आग लागल्याची घटना घडली आहे. निळजे - तळोजा रेल्वे स्टेशन दरम्यान एक्सप्रेसच्या मालडब्याला आग (Fire) लागल्याची घटना निदर्शनास आली. त्यानंतर हिसार कोईम्बतूर एसी एक्सप्रेस थांबविण्यात आली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला कळविण्यात आले.

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचताच आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला.त्यांनी आग लागलेल्या बोगी वेगळ्या करण्याचे काम सुरू केले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची वार्ता प्रवाशांमध्ये पसरताच एकच भीती पसरली. आग लागल्यानंतर अनेक प्रवासी एक्सप्रेसमधून बाहेर पडले. त्यामुळे रेल्वे (Railway) ट्रॅकवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

एक्सप्रेस ट्रेनच्या माल डब्ब्याला वेगळं करुन ट्रेनला पुढे सोडण्यात आलेय. या घटनेमुळे रेल्वे सेवेवर काहीकाळ परिणाम झाला असून तो सोडविण्याचे काम रेल्वे कर्मचारी करत आहेत. आगीचे करणाही अद्याप अस्पष्ट असून तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT