महाडमध्ये हिरवळ संस्थेतर्फे आठ हजार पूरग्रस्तांना मदत राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

महाडमध्ये हिरवळ संस्थेतर्फे आठ हजार पूरग्रस्तांना मदत

महाड शहराला बसलेल्या महापूराच्या फटक्यातून नागरिकांना सावरण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. वीस दिवसानंतरही पूरबाधितांसाठी मदतीचा ओघ अद्याप सुरूच आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाड : महाड शहराला बसलेल्या महापूराच्या फटक्यातून नागरिकांना सावरण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. वीस दिवसानंतरही पूरबाधितांसाठी मदतीचा ओघ अद्याप सुरूच आहे.  सामाजिक कार्यकर्ते आणि हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया यांनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकीतून महाडकरांना स्वच्छतेसाठी फिनेल तसेच एलएडी ट्यूब आणि बल्बचे मोठ्या प्रमाणात वाटप केले.

हे देखील पहा -

महाड औद्योगिक वसाहतीमधील पिडीलाईट इंडस्ट्रीज ( फेविकॉल ) आणि हिरवळ संस्थेतर्फे महाड शहरातील आठ हजार  पूरग्रस्त कुटुंबांना एलईडी बल्ब, ट्यूब लाइट आणि फिनेलचे वाटप करण्यात आले.  शहरातील कोटेश्वरी मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला.

महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या हस्ते या मदत वाटपाचा अनौपचारिक शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी पिडिलाईटचे प्रमुख संजय घवघवे, हिरवळचे अध्यक्ष किशोर धारिया, शेखर गायकवाड, प्रदीप शेठ, संतोष बुटाला, कुणाल गुरव आदि उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT