HINGOLI SHOCKER: POLICE OFFICER ACCUSED OF ASSAULTING WIFE WHO TRIED TO STOP HIS SECOND MARRIAGE, 11 BOOKED Saam tv
महाराष्ट्र

Shocking : पहिली बायको असताना पोलिस करत होता दुसरं लग्न, जाब विचारताच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; हिंगोलीतील संतापजनक घटना

Hingoli Crime News : हिंगोलीतील वसमत येथे दुसरे लग्न थांबवण्यासाठी आलेल्या पत्नीला पोलीस पती व इतरांकडून मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • हिंगोलीतील वसमत येथे पोलीस कर्मचाऱ्याच्या दुसऱ्या लग्नादरम्यान मोठा वाद

  • दुसरे लग्न थांबवण्यासाठी आलेल्या पहिल्या पत्नीला मारहाण

  • या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • ११ जणांविरोधात गुन्हा दाखल

पोलीस म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा देव. मात्र या खाकी वर्दीतल्या पोलिसाने आपला राक्षसी चेहरा जगासमोर आणलाय. बातमी आहे हिंगोलीची. हिंगोलीत एका पोलिसाने आपल्या पत्नीला अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे हा पोलीस दुसरं लग्न करत असल्याचं त्याच्या पत्नीला समजलं होतं. या माहितीच्या आधारे तिने लग्नविधी सुरु असताना घटनास्थळावर धाड टाकत लग्न थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत गजभारे हे नांदेड पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांचे पहिले लग्न झालेले असताना त्यांनी पहिल्या पत्नीच्या नकळत वसमत शहरातील कृष्ण मंगल कार्यालयात दुसरे लग्न करण्याची तयारी सुरू केली होती. दरम्यान, पती दुसरे लग्न करत असल्याची माहिती पहिल्या पत्नीला मिळाली. त्यानंतर ती थेट मंगल कार्यालयात पोहोचली आणि पतीला या विवाहाबाबत जाब विचारू लागली.

यावेळी मंगल कार्यालयात उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी तिला विरोध केला. पत्नीने विवाह थांबवण्याचा प्रयत्न करत असताना वाद निर्माण झाला. आरोपानुसार, प्रशांत गजभारे यांनी पत्नीशी हुज्जत घालत तिच्यावर हल्ला केला. यादरम्यान उपस्थित काही जणांनीही तिला मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये संबंधित महिलेला मारहाण होत असल्याचे दिसत आहे.

घटनेनंतर पीडित महिलेने वसमत शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्रशांत गजभारे यांच्यासह एकूण ११ जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस दलात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचे नाव या प्रकरणात समोर आल्याने चर्चांना उधाण आले आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून व्हायरल व्हिडिओ, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT