Hingoli Superstition News
Hingoli Superstition News संदिप नागरे
महाराष्ट्र

अंधश्रद्धेचा कळस! ६ महिन्यांच्या चिमुकलीच्या अंगात देवी येत असल्याची अफवा; दर्शनासाठी लोकांच्या रांगा

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली: हिंगोलीच्या (Hingoli) सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी गावात अंधश्रद्धेच्या (Superstition) प्रकाराने कळस गाठला आहे. कापडसिंगी गावातील एका कुटुंबात जन्मलेल्या सहा महिन्यांच्या मुलीच्या अंगात देवी येत असल्याची अफवा पसरली आहे. यामुळे चिमुकलीच्या घरी पंचक्रोशीमधील हजारो नागरिकांनी गर्दी केली आहे. सध्या गणेशोउत्सव सुरू असताना देखील गावकरी श्री गणेशाची पूजाअर्चा सोडून या चिमुकलीचे दर्शन घेण्यासाठी तिच्या घरी दाखल होत आहेत. (Hingoli Superstition News)

मिळालेल्या माहितीनुसार, हा अंधश्रद्धेचा बाजार सुरू असताना स्थानिक प्रशासनासह पोलीस प्रशासनाने मात्र डोळेझाक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या चिमुकलीच्या घराच्या अंगणात अनेक महिला भाविक अंगामध्ये देवी येत असल्याचा बनाव करत असून, तासनतास त्या ठिकाणी अघोरी प्रक्रिया देखील करत आहेत. या ठिकाणी अनेक महिला येतात आणि अंगात आलं असल्याचं सोंग करतात. तसेच पंचक्रोशीतील लोकांच्या गर्दीमुळे चिमुकलीला तासनतास गर्दामध्ये लोकांसमोर दर्शनासाठी ठेवण्यात येत आहे. या सर्व प्रकाराकडे प्रशासनाने मात्र डोळझाक केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: नायर रुग्णालयाच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या, धक्कादायक VIDEO आला समोर

Janhvi Kapoor : परम सुंदरी; जान्हवी कपूरच्या सौंदर्यावर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या...

Today's Marathi News Live: काँग्रेसच्या माजी नगरसेविका मीरा पाटील यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

Abhishek Ghosalkar: हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सर्व CCTV फुटेज कुटुंबियांना दाखवा: हायकोर्ट

Night Skin Care: मुलायम त्वचेसाठी रात्री झोपण्यापुर्वी करा 'या' गोष्टी

SCROLL FOR NEXT