Hingoli College News Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli News : हॉस्टेलमध्ये मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; लटकलेली होती, इतक्यात मैत्रिणी आल्या अन् जीव वाचला

Hingoli Crime News : हिंगोलीमधील एका शासकीय वसतीगृहामध्ये ही घटना घडली आहे. पीडित विद्यार्थिनीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला यामागील कारण अजूनही अस्पष्ट आहे.

Yash Shirke

भारत नागरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Hingoli News : हिंगोलीतून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बारावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने खोलीत गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मैत्रिणी खोलीत आल्याने विद्यार्थिनीचा जीव वाचला असल्याची माहिती समोर आली आहे. शासकीय वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विद्यार्थिनी हिंगोलीत समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृहामध्ये राहते. या विद्यार्थिनीने राहत्या खोलीत गळफास लावण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी तिच्या मैत्रिणींनी खोलीत प्रवेश केला. त्यांनी आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीला वाचवले. त्यानंतर पीडितेला वसतीगृहातून रुग्णालयात नेण्यात आले.

पीडित विद्यार्थिनीला गळफास घेतलेल्या अवस्थेत हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी हिंगोलीतून नांदेडला हलवण्यात आले. पीडितेची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या नांदेडमधील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत.

बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास लावून जीव देण्याचा प्रयत्न का केला यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी हिंगोली पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

SCROLL FOR NEXT