Nylon Manja Saam tv
महाराष्ट्र

Nylon Manja : हिंगोलीत नायलॉन मांजामुळे तरुणाचा चिरला गळा

Hingoli News : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविले जातात. यासाठी नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो. परंतु मांजामुळे अनेक घटना दरवर्षी घडत असतात.

संदीप नागरे

हिंगोली : बंदी असतानाही नायलॉन मांजाचा सर्रास वापर केला जात आहे. यामुळे काही दुर्घटना देखील घडल्या असून (Hingoli) हिंगोली शहरात देखील नायलॉन मांजामुळे गळा कापला गेल्याची घटना घडली आहे. सुदैवाने तरुणाचा जीव वाचला आहे. (Live Marathi News)

मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) पार्श्वभूमीवर पतंग उडविले जातात. यासाठी नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो. परंतु मांजामुळे अनेक घटना दरवर्षी घडत असतात. यामुळे काहींचा जीव देखील गेला आहे. यामुळे नायलॉन मांजा (Chinese Manja) वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील चोरून लपून मांजा विक्री व त्याचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. या मांजामुळे हिंगोलीत एका तरुणाचा जीव जाताजाता वाचला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हिंगोलीत नायलॉन मांज्याने तरुणाच्या गळ्याला गंभीर इजा झाली आहे, ओम उद्धव बांगर असे या तरुणाचे नाव असून, या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर हिंगोली शहरातील सामाजिक संघटनांनी  चायनीज नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या  विरोधात कडक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Maharashtra News Live Update: काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे - फडणवीस

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT